देश विदेश

हे काय? बाळाला चक्क दोन लिंग, महिलेच्या प्रसृतीनंतर डॉक्टरही चक्रावले

ब्राझीलमध्ये बाळाला चक्क दोन लिंग असल्याचं समोर आलं. महिलेने दिलेले बाळ पाहून डॉक्टरही चक्रावले.

Vishal Gangurde

ब्राझीलमध्ये एका बाळाचा जन्म दोन लिंगांसह, डॉक्टर चक्रावले

दुर्मीळ वैद्यकीय स्थिती, डॉक्टरही चक्रावले

जागतिक वैद्यकीय क्षेत्रात या घटनेबद्दल चर्चेला उधाण

भारत असो ब्राझील...कुठे कधी काय घडेल याचा नेम नसतो. जगातील चमत्कार हे बहुधा रुग्णालयातच पाहायला मिळतात. या चमत्काराचे पहिले साक्षीदारच असतात. तुम्ही काही माणसांना एका हात किंवा पायाला सहा बोटे असल्याचे पाहिले असेलच. काही वर्षांपूर्वी बिहारमधील एका रुग्णालयात तीन हातांचे बाळ जन्माला आले होते. मात्र, ब्राझीलमध्ये जन्माला आलेल्या एका बाळाला चक्क दोन लिंग असल्याचे समोर आलं आहे. ही विचित्र स्थिती पाहून डॉक्टरही चक्रावले.

मीडिया रिपोर्टनुसार, ब्राझीलच्या एका रुग्णालयात दोन लिंग असलेलं बाळ जन्माला आलं. त्यामुळे ब्राझीलच्या या रुग्णालयातील डॉक्टरही चक्रावले. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून आकाराने मोठे लिंग काढून टाकले.

साधारणपणे जन्माला आलेल्या बाळांना इतर भागातील जास्तीचे अवयव येतात. त्यावेळी चमत्कार मानला जातो. एखाद्याला जास्तीचे अवयव येण्यालाही वैद्यकीय कारण आहे. व्यक्तीला दोन हात-दोन पायांहून अधिक हात-पाय असण्याला पॉलिमेलिया म्हणतात. अधिक बोटे असण्याला पॉलीडॅक्टिली म्हटलं जातं. तर ब्राझीलमध्ये जन्माला आलेल्या बाळाला दोन लिंग असल्याने त्या स्थितीला डायफेलिया म्हटलं जातं.

दहा लाखांमध्ये एखाद्या बाळाची अशी स्थिती असते. मेडिकलच्या इतिहासात आतापर्यंत १०० असे प्रकरणे समोर आले आहेत. डायफेलियाचा प्रकार पहिल्यांदा १६०९ साली नोंद झाला होता. डॉक्टरांनी दुसरं लिंग वेगळं का केलं, अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

'द इंडिपेंडेट' वृत्तानुसार, ब्राझीलमधील ही घटना २०२२ सालची आहे. डॉक्टरांनी जर्नल ऑफ पीडियाट्रिक युरोलॉजीमध्ये हा रिपोर्ट प्रकाशित केला होता. या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, दोन लिंग असलेलं बाळ दुर्मिळ असते. या बाळाला डायफेलिया होता. दोन्ही लिंग एकमेकांच्या बाजूला होते. एक लिंग त्याच्या वयानुसार योग्य होतं. तर दुसरं लिगं आकाराने मोठे होते. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून आकाराने लिंग काढून टाकले.

शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यावेळी बाळ दोन वर्षांचं होतं. शस्त्रक्रिया दोन वर्षांनी का करण्यात आली, याची माहिती समोर आलेली नाही. खरंतर सुरुवातीला दोन्ही लिंग एकाच आकाराचे दिसत होते. बाळ हे आकाराने लहान असलेल्या लिंगाने लघवी करत होतं. त्यामुळे डॉक्टरांनी आकाराने मोठे असलेले लिंग हे शस्त्रक्रिया करत काढून टाकले. डॉक्टरांनी दुसरं लिंग काढून टाकल्यानंतर ती जागा टाके मारून बंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

SCROLL FOR NEXT