राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या रिक्षाचालकाचा माज काही तासांतच उतरला; कान पकडून मागितली माफी

thane news : राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या रिक्षाचालकाने माफी मागितली आहे. त्याने कान पकडून माफी मागितली.
Raj thackeray news
mns news Saam tv
Published On
Summary

राज ठाकरेंना शिवीगाळ करणारा रिक्षाचालक नरमला

रिक्षाचालकाने हात जोडून माफी मागितली

मनसैनिक रिक्षाचालकाला चोप देण्यावर ठाम

विकास काटे, साम टीव्ही

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या रिक्षाचालकाने अखेर कान पकडून माफी मागितली आहे. ठाण्यातील गांधीनगरमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकाने शिवीगाळ केली होती. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर रिक्षाचालकाचा माज उतरला आहे. चूक कबूल करत रिक्षाचालकाने कान पकडत आणि उठाबशा काढत माफी मागितली आहे.

शैलेंद्र यादव असे माफी मागणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे. शैलेंद्र याने दारुच्या नशेत ठाण्यातील गांधीनगरमध्ये एका मराठी तरुणाला शिवीगाळ केली. त्यानंतर रागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनाही शिवीगाळ केली. शिवीगाळ करणाऱ्या रिक्षाचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. ठाण्यात फक्त भैय्यांचा राज, असं म्हणत रिक्षाचालकाने राज ठाकरेंना शिवीगाळ केली होती.

Raj thackeray news
Sangli Accident : सांगलीत भीषण अपघात; मद्यधुंद कार चालकाने ४-५ वाहनांना उडवलं, परिसरात खळबळ

रिक्षाचालकाचा व्हिडिओ व्हायरल होताच शिवीगाळ करणाऱ्या शैलेंद्र यादव आणि राकेश यादव या दोघांविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसैनिकांच्या हाती लागण्याआधीच रिक्षाचालकाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर पोलिसांकडे शरणागती घेतली.

या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालक शैलेंद्र यादवला अटक केली आहे. तर दुसरा आरोपी राकेश यादव फरार आहे. मात्र, राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या रिक्षाचालकावर मनसैनिक अजूनही संतापलेले असल्याचे माहिती मिळत आहे. या रिक्षाचालकाला मनसे स्टाईल उत्तर देणार असल्याचा इशारा मनसैनिकांनी दिला आहे.

Raj thackeray news
ZP Election : जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर? आरक्षणाच्या सुनावणीचा निवडणुकीला फटका? VIDEO

रिक्षाचालक काय म्हणाला?

रिक्षाचालक शैलेंद्र यादव याने म्हटलं की, मी हात जोडून माफी मागतोय. काल गांधीनगरमध्ये शिवसेना शाखेच्या समोर रिक्षा उभी करत होतो. त्यावेळी एका अज्ञात व्यक्ती आला. त्याच्यासोबत माझं भांडण झालं. त्यावेळी मराठी-हिंदी भाषेवरून वाद झाला. मी रागाच्या भरात राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना शिवीगाळ केली. त्यामुळे मी हात जोडून माफी मागतो. मी दुसऱ्यांदा अशी चूक करणार नाही. दारूच्या नशेत माझ्याकडून चूक झाली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com