Raosaheb Danve on Manoj Jarange Patil Saam TV
देश विदेश

Raosaheb Danve : जालन्यात मनोज जरांगे फॅक्टर प्रभावी ठरला का? रावसाहेब दानवे म्हणाले, "माझा पराभव..."

Raosaheb Danve on Manoj Jarange Patil : जालना लोकसभा मतदारसंघातून तुमच्या पराभवाला मनोज जरांगे फॅक्टर प्रभावी ठरला का असा प्रश्न पत्रकारांनी रावसाहेब दानवे यांना विचारला.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदाही केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) सर्वाधिक खासदार निवडून आले. पण महाराष्ट्रात त्यांची मोठी पिछेहाट झाली. महायुतीला फक्त १७ जागांवरच विजय मिळवता आला. भाजपचे अनेक दिग्गज नेते निवडणुकीत पराभूत झाले. यामध्ये रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे.

रावसाहेब दानवे सलग ५ वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी केंद्रात मंत्रिपदही भूषवलं. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांनी जवळपास दीड लाखांच्या मताधिक्याने दानवेंचा पराभव केला.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपला फटका बसण्याचं कारण मनोज जरांगे फॅक्टर असल्याचं बोललं जातंय. कारण, जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी रान उठवलं होतं. याशिवाय त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकाही केली होती. यावर पत्रकारांनी याबाबत रावसाहेब दानवे यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलंय.

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

भाजप नेते रावसाहेब दानवे दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "२०१४ पासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. तेव्हापासून भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. देश प्रगतशील करण्याचं भारतीयांचं स्वप्न नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत".

"पंतप्रदान मोदी यांनी सर्वात जास्त शेतीसाठी बजेट दिलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी गुंतवणूक करण्यासाठी निधी दिलेला आहे. आज मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी पहिला निर्णयही शेतकरी हिताचा घेतला", असं रावसाहेब दानवे म्हणाले.

जालन्यात जरांगे फॅक्टर प्रभावी ठरला का?

"लोकसभा निवडणुकीतील माझा पराभव हा जनतेने केला आहे. तो पराभव आम्ही स्विकारला आहे. कुणीही याचं श्रेय घेऊ नये, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना चिमटा काढला. जालन्यात मनोज जरांगे फॅक्टर प्रभावी ठरला का? असा प्रश्न पत्रकारांनी दानवे यांना विचारला. यावर दानवे म्हणाले, मला असं वाटतं तो विषय आता चर्चेचा नाही. या विषयावर नंतर कधी बोलू", असं म्हणत दानवे यांनी बोलणं टाळलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

नवं वर्ष लय 'महाग' जाणार! मोबाइल कंपन्यांचे रिचार्ज २० टक्क्यांपर्यंत वाढणार, 'खिसाफाड' रिपोर्टमधील दाव्यानं यूजर्सना धडकी

Success Story: वडिलांना UPSCत अपयश, लेकीने केले अपूरं स्वप्न पूर्ण; मेडिकलचे शिक्षण सोडून झाल्या IAS अधिकारी

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT