Ram Temple Donation Row 
देश विदेश

Ram Temple: राममंदिर चोरीविरोधात साधू-संत रस्त्यावर; पंतप्रधान निवासस्थानाकडे साधू करणार आंदोलन

Ram Temple Donation Row: राममंदिरातील कथित दानचोरी प्रकरणावरून साधू-संतांमध्ये रोष निर्माण झाल्याचा दावा आहे. निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी सुमारे ५०० संतांनी पंतप्रधान निवासस्थानाकडे मोर्चा काढल्याची माहिती समोर आली आहे.

Suprim Maskar

  • राममंदिर दानचोरी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी साधू संतांचे आंदोलन

  • राममंदिर चोरीविरोधात ५०० साधू संतांचा पंतप्रधान निवासस्थानाकडे मोर्चा

  • राममंदिरातील दानचोरी प्रकरणावर साधू संत आक्रमक

गेल्या काही दिवसात राममंदिरातील दानचोरी प्रकरणानं देशातील हजारो हिंदू बांधवांमध्ये रोष पाहायला मिळतोय. अशातच राममंदिरातील या चोरीची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी 500 संत आणि सांधूंनी थेट पंतप्रधान निवासस्थानाकडे मोर्चा काढला. यावेळी पंतप्रधानांना मागण्याचं निवेदन सोपवणारं असल्याचं सांगत साधूंनी आक्रमक पवित्रा घेतला.

मात्र पंतप्रधान निवासस्थानाकडे जाण्यास पोलिसांनी साधू संताना रोखल्यानं ते थेट रस्त्यावरच झोपले. अनेक जण रस्त्यावरच बसले. मुळात राममंदिरातील दानचोरीमुळे सनातन धर्माची बदनामी झाल्याचा आरोप करत साधूंनी थेट सीबीआय चौकशीची मागणी केलीय.इतकचं नव्हे तर याप्रकरणाची सीबीआय चौकशी केली नाही तर चित्रकुट ते अयोध्येपर्यंत चंदाचोरी ते से आस्था बचाव यात्रा काढण्याचा इशारा दिलाय.

एकीकडे राम मंदिरातील दानचोरी प्रकरणाची SIT चौकशी सुरु आहे. अशातच दोन महिने होऊनही याप्रकरणातील बडा मासा यंत्रणांच्या हाती लागलेला नाही..त्यामुळे आता याप्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी थेट साधू संतांनी केलीय. आधीच विरोधकांनी संसदेत राम मंदिर चोरीचा मुद्दा तापवलेले असताना दुसरीकडे साधू संतांनीच याविरोधात आवाज उठवल्यानं राममंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा तापणार, हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

रिलस्टारमुळे ट्राफिक जाम, पुणेकरांना घाम, पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रीलबाजांचा धुमाकूळ

SCROLL FOR NEXT