Congress  Saam tv
देश विदेश

राज्यसभा निवडणुकीसांठी काँग्रेसची जोरदार फिल्डिंग; कोणाला मिळणार उमेदवारी? ही नावे चर्चेत

rajya sabha election 2026 : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्याची काही नावे चर्चेत आहे.

Vishal Gangurde

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची फिल्डिंग

काँग्रेसला ६ जागा जिंकण्याची संधी

मध्य प्रदेशातून काँग्रेसचे ३ उमेदवार जिंकण्याची शक्यता

राज्यसभेच्या काही जागांवर जूनमध्ये निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार मोर्चबांधणी करत आहे. काँग्रेसला कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमध्ये एकूण ६ जागा जिंकण्याची संधी आहे.

राज्यसभेत सध्या काँग्रेसचे २९ सदस्य आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीत बाजी मारल्यास काँग्रेसचे राज्यसभेत ३० हून अधिक खासदार होऊ शकतात. खासदारांची संख्या वाढल्यास राज्यसभेत काँग्रेसची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला कर्नाटकातून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकात काँग्रेस राज्यसभेच्या ३ जागा जिंकू शकते. तर मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंडमध्ये प्रत्येकी एक-एक जागा जिंकण्याची शक्यता आहे. कर्नाटकात काँग्रेसचे आमदार सर्वाधिक आहे. कर्नाटकातील विधी मंडळातील २२४ सदस्यांपैकी काँग्रेसचे १३६ आमदार आहेत. या आकडेवारीनुसार, काँग्रेसचे कर्नाटकातून ३ राज्यसभा उमेदवार सहज विजयी होतील. कर्नाटकात राज्यसभा उमेदवाराला विजयासाठी ४६ आमदारांच्या मतांची आवश्यकता लागणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे हे कर्नाटकात आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी निश्चित उमेदवार मानले जात आहेत. त्यानंतर कर्नाटकातील उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे भाऊ डी. के. सुरेश, युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास यांच्या नावाची चर्चा आहे. लिंगायत समाजाच्या महिला नेत्या, माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या नावाची देखील चर्चा आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे. मध्य प्रदेशातून काँग्रेसचा एक राज्यसभा उमेदवार जिंकू शकतो. मध्य प्रदेशातील २३० विधानसभा सदस्य असलेल्या सभागृहात काँग्रेसचे ६६ आमदार आहेत. या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात राज्यसभा उमेदवारासाठी ५९ आमदारांच्या मतांची गरज लागेल. मध्य प्रदेशातून राज्यसभेत काँग्रेसकडून जाण्यासाठी अनेक जण इच्छुक आहे. यात माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिग्विजय सिंह, मिनाक्षी नटराजन, ओबीसी नेते अरुण यादव यांच्या नावाची चर्चा आहे. हरियाणा, राजस्थान आणि झारखंडमध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. या तिन्ही राज्यात इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divyenndu- Mirzapur The Movie : मुन्ना भैया मोठ्या पडद्यावर येणार; 'मिर्झापूर: द मुव्ही' रचणार मोठा इतिहास, 'या' ट्विस्टने खेळ बदलणार

Cockroach Janata Party: 'कॉकरोच जनता पार्टी'ची कल्पना सुचली कशी? अभिजीत दीपकेंचा मोठा खुलासा, पाहा Exclusive मुलाखत

Expressways : महाराष्ट्राला मिळाले ४ नवीन द्रुतगती महामार्ग; ५१,९०६ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी, २०२८ पर्यंत प्रवास होणार सुस्साट

घरात जिकडे तिकडे झुरळं दिसतायेत? ही सोपी ट्रिक वापरा, झुरळ जातील मरून

Maharashtra News Live Update: कांद्याचे दर घसरल्याने केंद्राचे पथक कालपासून नाशिक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT