Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Marathi Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगेचं उपोषण, विदर्भात अन् मराठवाड्यात पावसाची हजेरी, केंद्रीय मंत्रिमंडळाची आढावा बैठक, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

Amravati:  4 जणांचा बळी घेणारी बोर अभयारण्यतील पिंकी वाघिणीचा मृत्यू

अमरावती -

4 जणांचा बळी घेणारी बोर अभयारण्यतील पिंकी वाघिणीचा मृत्यू

आज शिरजगाव कसबा भागात या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन मारण्यात आले

जेरबंद केल्यानंतर उपचारासाठी नागपूर येथे घेऊन जात असताना मोर्शी दरम्यान या वाघिणीचा मृत्यू झाला

वन विभागाचं पथक या वाघिणीला परत परतवाडा येथे पोस्टमार्टम करिता घेऊन येत असल्याचे सूत्रांनी सांगितले

पिंकी वाघिणीला ठार मारण्यात यावे ही संतप्त जमावाने केली होती मागणी

या पिंकी वाघिणीने अमरावती जिल्ह्यातील ३ आणि वर्धा जिल्ह्यातील एका व्यक्तीचा जीव घेतला होता

Sambhajinagar:  छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे.

पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके हातची जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी परिस गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे.

Pune: पुण्यातील खेडशिवापूर परिसरातील मानवी वस्तीजवळ आढळले दुर्मिळ खवले मांजर

पुणे -

पुण्याच्या भोर तालुक्यातील खेडशिवापूर परिसरातील मानवी वस्तीजवळ आढळले दुर्मिळ खवले मांजर

माहिती मिळताच पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेतली..आणि काळजीपूर्वक खवले मांजराचे रेस्क्यू केले..

त्यानंतर खवले मांजराच्या शरीरावर जखम आहे का? याची तपासणी करण्यात आली.

प्रकृती व्यवस्थित असल्याचे आढळल्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला पुन्हा सुरक्षित वनपरिक्षेत्रात मुक्त करण्यात आले.

Akola: महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोला जिल्ह्यात आज पावसाने लावली हजेरी

- महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोला जिल्ह्यात आज पावसाने लावली हजेरी

- अकोला जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आली होती

- आज सायंकाळी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका परिसरात पावसाला सुरुवात झाली

- गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते

- अखेर आज पावसाने हजेरी लावल्याने सुकत चाललेल्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला

मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणी नकार कायम

मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणी नकार कायम ....

दोन दिवसांपासून मनोज जरांगे वैद्यकीय तपासणीला नकार देत असून दोन दिवसांपासून त्यांनी पाणी आणि वैद्यकीय उपचार घेतलेले नाहीत...

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे

उल्हासनगरच्या महापौरांच्या जनता दरबारात जोरदार गोंधळ

महापौरांच्या जनता दरबारात जोरदार गोंधळ!

पाणी प्रश्नावर भाजप आक्रमक

महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत “महापौर हाय हाय”

ऑपरेशन टायगर आता होणार नाही -  अंबादास दानवे

अॉपरेशन टायगर आता होणार नाही, ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांच वक्तव्य

खासदार फुटले त्या वेळी संख्या वेगळी होती,यावेळी ती संख्या गाटु शकणार नाहीत,दानवे यांना विश्वास

तर उध्दव ठाकरेंची शिवसेना आता कारवाईच्या पवित्र्यात,दानवे यांची माहीती

दहीहंडीतील ध्वनीप्रदूषणावर पोलिसांचा दणका! 16 डीजे चालकांवर गुन्हे; डॉल्बी, स्पीकरसह साहित्य जप्त 

दहीहंडी उत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषण करणाऱ्या मंडळे आणि डीजे चालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करत 16 डीजे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

रिसोड तहसीलदारांच्या ‘रील’ प्रकरणावर स्वाभिमानी संतप्त; ‘शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रील बनवा’ 

वाशिमच्या रिसोड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या रील प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संतप्त प्रतिक्रिया दिली. “तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रील बनवायला हवी,” अशी टीका युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी केली. ठेकेदार आणि रेती माफियांबाबतही त्यांनी सवाल उपस्थित करत, “रील बनवून तुम्हाला नेमकं दाखवायचंय कुणाला?” असा प्रश्न केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या ‘चलो मुंबई’च्या घोषणेला महिलांचा पाठिंबा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महिलांनी आक्रमक भूमिका घेत ‘चलो मुंबई’चा नारा दिला. 12 सप्टेंबरला अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक होणार असल्याचे महिलांनी सांगितले. “आता आम्ही थेट वर्षा बंगल्यावर जाऊन अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारणार,” अशी तीव्र प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली. “आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.

शेवटच्या श्रावणी सोमवारी मार्कंडा देवस्थानात भाविकांची प्रचंड गर्दी; सुरक्षेसाठी SDRF अलर्ट मोडवर

आज श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी मार्कंडा देवस्थानात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्री वैनगंगा नदीकाठी महागंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवारपासून महागंगा आरती सुरू करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन; 9 तासांनंतर तरुण टॉवरवरून खाली 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूरच्या रेनापूर तालुक्यातील पोहरेगावात तरुणांनी आंदोलन केले. काही तरुण मोबाईल टॉवरवर चढले आणि ‘शोले स्टाईल’ आंदोलन सुरू करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
तब्बल नऊ तास हे आंदोलन सुरू होते.

वाशिममध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा; काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक 

वाशिम जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके करपल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

तहसीलदारांच्या रील प्रकरणावर काँग्रेस संतप्त; कारवाईची मागणी

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या शासकीय कार्यालयातील रील प्रकरणावर काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकरी दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करत असताना कार्यालयात रील बनवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जावे, अशी टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजू चौधरी यांनी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तहसीलदारांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Pune : केतन अग्रवाल खून प्रकरण : कट रचल्याचे निष्पन्न झाले

रितेश हागे हा चेतन चौधरीचा मित्र होता. त्याला १२ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. कोणालाही अटक करताना आधार काय आहे त्याची पूर्तता करणे गरजेचे असते. जबाब आणि तांत्रिक पुरावे याच्या आधारे माहिती घेऊन आम्ही चौकशी केली. आम्हाला पुरावे आढळून आले आहेत, असे पोलिस अधीक्षक पुणे संदीपसिंग गिल यांनी सांगितले.

माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

शिवाजीराव पंडित यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दहावा दिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर 2026 रोजी गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ते दुपारी सुमारे 12 वाजता, वडोदरा इथे 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. संध्याकाळी सुमारे 5:45 वाजता, पंतप्रधान मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 चे (GFF - Global Fintech Fest) अर्थात जागतिक वित्तीय तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन करतील, यावेळीही ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

नाटक बंद करा, हिम्मत असेल तर राजीनामे द्या, काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरून भाजप आणि मनसेमध्ये सुरू असलेल्या वादाचे पडसाद आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या राजकारणातही उमटू लागले आहेत. भाजपने मनसेला सत्तेतून बाहेर करण्याची भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

भाजपला खरोखरच सत्तेतून बाहेर पडायचे असेल, तर सत्तेतील पदांचे राजीनामे द्यावेत. राजीनामे देण्याची तयारी नसेल तर राजकीय नाट्य बंद करून ९ सप्टेंबरची महासभा रद्द करावी, अशी मागणी कांचन कुलकर्णी यांनी केली आहे.

बारामती : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बारामती शहर परिसरात पावसाची हजेरी

अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर बारामती शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली होती आज सकाळपासून वातावरणात बदल झाल्याने दुपारी अचानक बारामती शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली या परिसरात पाऊस कमी प्रमाणात झाला असून दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज मराठा क्रांती मोर्चा कडून सातारा बंदची हाक

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सातारा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. याला साताऱ्यातही प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रशांत नलावडे यांनी साताऱ्यातून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट केले आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा दहावा दिवस असूनही प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात वाघिणीची दहशत कायम

वाघिणीने हल्ला करून घेतला 24 तासात चांदूरबाजार तालुक्यात दुसरा बळी

शिरजगाव कसबा येथील दामू भाऊ आवारे यांचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू

काल सायंकाळी बकऱ्या चारणाऱ्या एका तरुणीचाही याच वाघिणीने घेतला बळी

आतापर्यंत या वाघिणींनी चार जणांचा बळी घेतला असून अनेक बकऱ्या आणि गाईंचाही जीव घेतला

वनविभागाने वाघिणीचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत तुफान राडा!

छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरातील माणिक हॉस्पिटलजवळ मनपा शाळेबाहेर दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एका तक्रारीनुसार, माहिती अधिकारातून माहिती मागितल्याच्या रागातून अझहर अफसर पठाण यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या हाताचे हाड मोडल्याचा आरोप असून, पैसे हिसकावून घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

पुण्यात प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलसह मंडळाच्या अध्यक्ष, आयोजकावर गुन्हा दाखल

दहीहंडी कार्यक्रमात कार्यक्रम सादर करताना अश्लिल नृत्य सादर होऊ नये,यासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. या आदेशानुसार प्रमाणपत्र सादर न केल्याने मंडळाला कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती.असे असताना कार्यक्रम करणाऱ्या प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष, आयोजकावर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोलापुरात गोकुळ शुगर साखर कारखान्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक

गोकुळ शुगर साखर कारखान्याकडून बिल दिले जात नसल्यामुळे शेतकरी चढले झाडावर..

गोकुळ शुगर साखर कारखान्याचे दत्ता शिंदे यांना अटक करण्याची शेतकऱ्यांची मागणी..

सोलापुरातील पूनमगेट येथील झाडावर चढून आंदोलन सुरू

पुणे कृषी आयुक्तालयासमोर आंदोलन

महाराष्ट्र कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

मोठ्या संख्येने तांत्रिक कृषी अधिकारी कर्मचारी आंदोलनात सहभागी

राज्यभरातील अधिकारी आंदोलनात सहभागी

तालुका कृषी अधिकाऱ्याला वर्ग एक दर्जा द्या आता दोनचा दर्जा आहे..

गावाकडची कृषी अधिकारी संख्या कमी करून जिल्हा कृषी आणले असल्याचा महासंघाचा आरोप..

सर्व समावेशक समिती स्थापन करावी

मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी ठिय्या आंदोलन करत आहेत..

नांदगावमध्ये आज धनगर समाजाचा विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा

नाशिकच्या नांदगाव मध्ये आज धनगर समाजाचा विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला,.धनगर आरक्षणाची अंमलवजावणी,संत बाळूमामा देवस्थानसाठी स्वतंत्र कायदा,लोणावळा मिसींग लिंकला विर सिंगरोजा धनगर यांचे नाव देण्यात यावे,मुंबईच्या चर्चगेटला पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे तसेच मेंढपाळना वनविभागाच्या चराई क्षेत्रात चराई पासेस देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी सकल धनगर समाजाचा तर्फे हा मोर्चा पुण्यश्लोक अहिल्याबाई उद्यानापासून ते नांदगाव तहसीलदार कार्यालया पर्यंत घोषणा देत मोर्चे का-र्यानी तहसीलदारांना निवेदन दिले,सरकार आमचे असले तरी आज आमच्या मागण्यासाठी राज्यभर आंदोलन करत असल्याचे धनगर समाजाच्या प्रतिनीधिनी स्पष्ट केले

कुडाळ येथील भंगसाळ नदीवरील गणेश घाटाचे लोकार्पण

कुडाळ नगरपंचायत आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरातील भंगसाळ नदीवर बांधण्यात आलेल्या गणेशघाट आणि परिसर सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आज आमदार निलेश राणे यांच्या मुख्य उपस्थितीत उत्साहात पार पडला. या गणेशघाट बांधणे आणि परिसर सुशोभीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा विकासनिधी आमदार निलेश राणे यांनी उपलब्ध करून दिला

धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी इंदापूर तहसीलदारांना निवेदन...

धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी इंदापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने कनेक्टिंग लिंकचं नामकरण करावं, चर्चगेट रेल्वे स्थानकाला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावं, तसेच श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे... यासोबतच धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सरकारने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे...

चनकापूर उजव्या कालव्याचे हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको..

Summary

चनकापूर उजव्या कालव्याचे हक्काचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना मिळावे, या मागणीसाठी नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे, कौळाणे, नगावसह परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. हक्काचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मालेगाव-मनमाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल दोन तास शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या देत प्रशासनाचे लक्ष वेधले. चनकापूर उजव्या कालव्याचे पाणी हे परिसरातील शेती आणि ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, पाण्याअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे तातडीने कालव्याचे हक्काचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.

मराठ्यांनी 12 तारखेला अंतरवालीत या- मनोज जरांगेंचं आव्हान

सरकार जाणून बुजून हलगर्जीपणा करतेय

शिंदे, फडणवीसांची मिलिभगत, आम्हाला फसवत आहे

मुंबईकडे निघू तेव्हा हल्ला करण्याचा प्रयत्न

मराठा आंदोलकांचा धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको

मराठा आंदोलकांचा धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको...

जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दहावा दिवस..

पोलिसांकडून रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न...

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवत असल्याने मराठा आंदोलन आक्रमक

कुणबी नोंदी आणि हैदराबाद गॅझेटनुसार मिळालेल्या नोंदी गाव पातळीवर लावण्याबाबत आढावा बैठक सुरू

कुणबी नोंदी आणि हैदराबाद गॅझेटिअरनुसार मिळालेल्या नोंदी गाव पातळीवर लावण्याबाबत आढावा बैठक सुरू

राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील अधिकारी आणि विभागीय आयुक्त सोबत बैठक सुरू

एकादशीनिमित्त माऊलींची संजीवन समाधी पुष्पसजावटीने सजली

आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात एकादशीनिमित्त आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली.

विविध रंगीबेरंगी फुलांनी सजलेले मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या सावटावर जिल्हा प्रशासन लागले कामाला

- सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या सावटावर जिल्हा प्रशासन लागले कामाला

- अनेकांनी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन चौकशी करण्याचे आणि माहिती गोळा करण्याचे दिले आदेश

- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या आदेशानंतर कृषी, महसूल, आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून कामाला सुरवात

Solapur : श्रावणातील शेवटच्या सोमवारी सिद्धेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी

श्रावणातील शेवटच्या सोमवारी सिद्धेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी

योग समाधीला आकर्षक फुलांची सजावट

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंबादास दानवे अंतरवाली सराटी येथे दाखल

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंबादास दानवे अंतरवाली सराटी येथे दाखल

दानवे जरांगे यांच्याशी चर्चा करणार

Nanded : कौटुंबिक त्रासाला कंटाळून हातात लग्नाचे बॅनर घेऊन मूकबधिर तरुण चढला टॉवरवर

कौटुंबिक छळाला कंटाळून एका मूकबधिर तरुणाने मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

विशेष म्हणजे याच टॉवरवर त्याने एक वर्षांपूर्वीही असाच प्रकार केला होता.नांदेडच्या लोहा येथील ही घटना आहे.

Bhandara : तुमसर शहरात पाण्यासाठी नागरिकांचा उद्रेक!

भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील नागरिक मागील ६ महिन्यांपासून पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यापासून वंचित असल्याने नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे.

प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही नगराध्यक्ष सागर गभणे व संबंधित अधिकारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, संतप्त नागरिकांनी थेट पाण्याची पाईपलाईन फोडून आपला तीव्र निषेध नोंदवला.

धाराशिवमध्ये पावसाने दडी मारल्याने सोयाबीन मातीमोल

धाराशिवमध्ये पावसाने दडी मारल्याने सोयाबीन मातीमोल

संतप्त शेतकऱ्यांचा मदतीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन

शेतकऱ्यांनी मस्सा खंडेश्वरी गावात कळंब - येरमाळा राज्य महामार्ग तासभर अडवला

शिक्षणासाठी सोनं गहाण ठेवतात आमची वयं वाढत चालली आहेत, घरातून लग्नाचा दबाव, विद्यार्थिनींनी मांडली व्यथा

पुण्यात आज एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज मोर्चा होतोय. या निमित्ताने पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आज अनेक विद्यार्थ्यांनी याठिकाणी आल्या होत्या. घरचे सोनं गहाण ठेवतात, आमचे घरचे आम्हाला अधिकारी बनू पाहू इच्छितात पण ते होताना दिसत नाही. आमची वयं वाढत चालली आहेत आम्हाला लग्नासाठी देखील दबाव येतो अशा मध्ये आम्ही कुठे जायचं आणि काय करायचं असा सवाल मोर्चा मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी केला आहे. या महिला विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी...

नवी मुंबई विमानतळाजवळ ओला चालकाची हैवानियत

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुनसान रस्त्यावर ओला चालकाने महिला प्रवाशासोबत छेडछाड करून तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मावळच्या सुपुत्राची भारतीय सैन्यात दिमाखदार झेप

मावळच्या मातीत वाढलेला सुपुत्र आता भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर सज्ज झाला आहे. मावळ तालुक्यातील साहिल भुजवडकर यांनी इंडियन आर्मी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधील खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत लेफ्टनंट पदावर गवसणी घातली आणि भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून देशसेवेत रुजू झाले

मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा - ठाकरे गटाची मागणी

मराठवाड्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत जालन्यात ठाकरे गटाने तुम से ना हो पायेगा आंदोलन केलय.जालना शहरातील महात्मा गांधी चमन येथे ठाकरे गटाने तुम से ना हो पायेगा धरणे आंदोलन केलय यावेळी महायुती सरकारवर जोरदार टीका करत मराठवाड्याच्या विकासासाठी जाहीर केलेल्या पॅकेजपासून ते जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांपर्यंत सरकारला धारेवर धरले.मराठवाड्यात दहा वर्षांपासून केवळ घोषांचे गाजर दाखवणाऱ्या सरकारने रखडलेल्या विकासकामांचा हिशेब द्यावा अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे...

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखासह 17 जणांवर गुन्हा दाखल

पालघरच्या रिलीफ हॉस्पिटल येथील रिसेप्शनिस्टला केलेल्या मारहाण प्रकरणात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखासह 17 जणांवर गुन्हा दाखल झाला.

पुण्यात आज MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

पुण्यात आज एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे. सकाळी १० वाजता पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरापासून या मोर्चेला सुरुवात होणार असून विविध मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. या मोर्चामध्ये काही राजकीय नेते सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती आहे. परीक्षा, भरती, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यासारखे अनेक विषय प्रलंबित असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून सरकारने या मागण्या पूर्ण कराव्या म्हणून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

एफएसआय वाढल्यामुळे पुणे शहराच्या पायाभूत सुविधांवर येणार प्रचंड ताण?

वाढत्या एफएसआय मुळे पुणे शहराची पायाभूत सुविधा कोलमडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे महापालिकेने पायाभूत सुविधा पुरविण्याची क्षमता तपासल्याशिवाय नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली. पुढील चार वर्षांत महापालिकेच्या हद्दीत ६.५० कोटी चौरस फूट बांधकाम होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतीच दिली. त्या पार्श्वभूमीवर चव्हाण म्हणाल्या, ‘राज्यात लागू करण्यात आलेल्या एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमुळे (यूडीसीपीआर) मोठ्या प्रमाणात बांधकामांना परवानगी मिळत आहे.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर : आगीतून वाचवले; पण जुळ्या चिमुकल्यांना नियतीने हिरावले

आग लागल्याने जीव वाचविण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतर... डॉक्टरांकडून उपचारांची शर्थ... नातेवाइकांच्या डोळ्यांत चिमुकल्यांच्या जगण्याची आस... मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. एशियन हॉस्पिटलमधील आगीच्या घटनेनंतर घाटी रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आलेल्या जुळ्या बाळांचा उपचार सुरू असताना रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला.

महामार्गावरील नाकाबंदीत मोठा पर्दाफाश; कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीचे रॅकेट उघडकीस

वाहनांच्या सायलेंसरमध्ये असलेल्या मौल्यवान धातूंवर चोरट्यांची नजर असल्याचा धक्कादायक प्रकार पारोळ्यात समोर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर म्हसवे गावाजवळ पारोळा पोलीस ठाणे आणि महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी यांच्या संयुक्त नाकाबंदीमध्ये संशयास्पद वॅगनार कार अडवण्यात आली. वाहनाची झडती घेतल्यानंतर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी कारमधून आसीफ यामीन आणि आरीफ सलीम या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून जुन्या मारुती सुझुकी ईको वाहनांचे तीन सायलेंसर किंवा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर तसेच अंदाजे पाच ते सहा किलो ‘सायलेंसर माती’ जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

क्रुझरच्या धडकेत कावड यात्रेतील शिवभक्ताचा मृत्यू

विशाल दीपक पवार या तरुणाचा मृत्यू, दहा जण गंभीर जखमी, जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रेफर

उमरखेड येथील महाकाल कावड मंडळ नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून उमरखेड कडे येत असताना मागून क्रुझरने जोरदार धडक दिल्याने यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दहा जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या तरुणाला मर्सिडीज कारने चिरडले

सांगलीमध्ये मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या तरुणाला मर्सिडीज कारने

चिरडल्याच्या घटना समोर आली आहे. यामध्ये जयंत पवार,राहणार कार्वे तालुका कराड या तरुणाचा मृत्यू झाला आहे.शुक्रवारी सायंकाळीच्या सुमारास हे घटना घडली आहे. शहरातल्या एसटी स्टँड समोर असणाऱ्या रस्त्यावर जयंत पवार हा मद्यधुंद अवस्थेत तोल जाऊन खाली कोसळला होता,यावेळी येथून जाणारी एक मर्सिडीज कार थेट त्याच्या अंगावरून गेली, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता, दरम्यान शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.भर पावसात रस्त्यावर मधुंद अवस्थेत पडलेल्या तरुणाच्या अंगावरून मर्सिडीज कार गेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

चौथ्या श्रावणी निमित्त औंढा नागनाथ मध्ये भक्तांची मोठी गर्दी

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मध्ये चौथ्या श्रावणी निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान मध्यरात्री मंदिर समितीच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले होते विशेष म्हणजे या सोमवारी शासकीय महापूजा व अभिषेकाचा मान मंदिरातील एका सुरक्षा गार्डला देण्यात आला होता, औंढा नागनाथ मध्ये आज सायंकाळपर्यंत लाखो भाविक दर्शन घेणार असून या भाविकांची व्यवस्था करण्यासाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते तर प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला होता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com