Rajya Sabha Election 2026 saam tv
देश विदेश

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Rajya Sabha Elections 2026: राज्यसभेतील 10 खासदारांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर 2026 रोजी संपणार आहे. या सर्व जागा उत्तर प्रदेशातील असून भाजप, समाजवादी पक्ष आणि बसपच्या जागांचा समावेश आहे.

Omkar Sonawane

राज्यसभा निवडणुकीचे पुन्हा एकदा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. नोव्हेबरमध्ये राज्यसभेतील 10 खासदार निवृत्त होणार असल्याने या जागांसाठी निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे, यापैकी तब्बल 9 जागा उत्तरप्रदेशातील आहेत, तर एक जागा उत्तराखंडमधील आहे. उत्तरप्रदेशमध्ये 2027 ला विधानसभा निवडणुका होणार असल्याने या राज्यसभा निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चा सुरू असतानाच या निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र NDA कडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. राज्यसभा निवडणुकीच्या तारखांची अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणुका होण्याचे सांगितले जात आहे.

सध्या राज्यसभेत 243 सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे 116, कॉँग्रेसचे 30, तृणमूल कॉँग्रेसचे 9 आणि द्रमुकचे 8 खासदार आहेत. तर 7 खासदार हे राष्ट्रपतीनियुक्त असतात. NDAच्या संख्याबळाचा विचार केला, तर हा आकडा 150च्या पुढे जातो. मात्र, दोन तृतीयांश बहुमतापासून NDA अजूनही दूर आहे. दुसरीकडे, INDIA आघाडीकडे 64 खासदार आहेत.

25 नोव्हेंबरला 10 खासदार होणार निवृत्त

25 नोव्हेंबर रोजी राज्यसभेतील एकूण 10 खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये भाजपचे 8, बहुजन समाज पक्षाचा 1 आणि समाजवादी पक्षाचा 1 खासदार आहे. उत्तराखंडमधील नरेश बंसल यांच्याव्यतिरिक्त उर्वरित सर्व खासदार उत्तर प्रदेशातील आहेत. भाजपकडून बृजलाल, सीमा द्विवेदी, चंद्रप्रभा, हरदीप सिंह पुरी, नीरज शेखर, अरुण सिंह आणि बी.एल. वर्मा हे खासदार निवृत्त होत आहेत.

समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव आणि बसपचे रामजी यांचाही कार्यकाळ संपत आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा संख्याबळात झालेल्या बदलाचा परिणाम राज्यसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाच्या आमदारांची संख्या वाढल्याने पक्षाला राज्यसभेत फायदा होऊ शकतो. तर भाजपच्या काही जागा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

Shocking News: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

SCROLL FOR NEXT