Rajgarh Bus Accident  Saam TV
देश विदेश

Accident : राजगडच्या पुलावर चालकाचा ताबा सुटला, स्लीपर बसचा भयंकर अपघात; ४ जणांचा मृत्यू, १२ गंभीर जखमी

Bus Accident : मध्य प्रदेशातील राजगडच्या ब्यावरा बायपासवर स्लीपर बसचा भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटून बस पुलाच्या भिंतीला धडकली. अपघातात चालकासह ४ जणांचा मृत्यू, तर १२ जण गंभीर जखमी झाले.

Namdeo Kumbhar

Rajgarh Madhya Pradesh sleeper bus accident today : शुक्रवारी सकाळी मध्य प्रदेशातील राजगड येथे एक भीषण अपघात झाला. लखनौहून इंदूरकडे जाणारी एक स्लीपर कोच बस बायपासवरील वळणावर पुलाच्या भिंतीला घासत पुढे निघून गेली. या धडकेमुळे बसच्या काचा फुटल्या आणि बसमधील प्रवासी थेट पुलावरून खाली पडले. या अपघातात चालकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ जण गंभीर जखमी आहेत.

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील ब्यावरा बायपासवर शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास एका खासगी स्लीपर कोच बसचा भीषण अपघात झाला. ही बस (NL 01 D-3436) उत्तर प्रदेशातील लखनऊहून उज्जैनमार्गे इंदूरकडे जात होती.

वळणाचा अंदाज न आल्याने अपघात

ब्यावरा बायपासवर असणाऱ्या तीव्र वळणावर चालकाला बसचा अंदाज आला नाही. गाडीवरील ताबा सुटल्याने चालकाने बस वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु बस पुलाच्या सिमेंट-काँक्रीटच्या वॉलला जोरदार धडकली आणि भिंतीला घासत पुढे निघून गेली. धडक इतकी जोरदार होती की बसच्या खिडक्यांच्या काचा फुटून अनेक प्रवासी पुलावरून खाली रस्त्यावर फेकले गेले.

चालकासह चार जणांचा मृत्यू

या अपघातात बस चालक विकास शुक्ला (रा. फतेहपूर, उत्तर प्रदेश) याच्यासह चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृत प्रवाशांमध्ये कर्नाटकातील बेंगळुरूचे रहिवासी रवी के.बी. (४५), बिहारच्या गोपाळगंजचे बेलाल अली आणि ज्योतिरादित्य सिंग गौड यांचा समावेश आहे.

१२ जण गंभीर जखमी, काहींना भोपाळला हलवले

अपघातात १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील प्रवाशांचा समावेश आहे. जखमींवर स्थानिक सिव्हिल रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आहे. अमित कुमार, सुरेंद्र प्रताप, सुमन शर्मा, श्रीनिवास आणि केशव या पाच गंभीर जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी भोपाळला रेफर करण्यात आले आहे.

प्रशासन आणि मंत्र्यांची घटनास्थळी भेट

अपघाताची माहिती मिळताच राजगडचे पोलीस अधीक्षक अमित कुमार तोलानी, ब्यावरा शहर व ग्रामीण पोलीस पथक तसेच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले. राज्याचे राज्यमंत्री नारायण सिंह पवार यांनीही रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि उपचारांची पाहणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT