जोधपूरमध्ये रविवारी भीषण बस-ट्रक अपघात झाला
भाविकांना घेऊन गेलेली टूरिस्ट बस कोलयत दर्शनावरून परतताना ट्रकला धडकली.
या भीषण अपघातात १८ भाविकांचा मृत्यू झाला
पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल, बचावकार्य सुरू
राजस्थानच्या जोधपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात देवदर्शनाहून परतणाऱ्या १८ हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भरधाव टूरिस्ट बसने ट्रकला धडक दिल्याने रविवारी ही मोठी दुर्घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील सूरसागर भागातील भाविकांना घेऊन ही बस बीकानेर येथील कोलयत येथे दर्शनासाठी गेली होती. देवदर्शन करून परतताना रस्त्याच्या बाजूला ट्रक ( ट्रेलर) उभा होता. या भाविकांच्या टूरिस्ट बसने या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात बसचा चक्काचूर झाला. भीषण अपघातात काही भाविकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील मृत भाविक जोधपूरच्या सूरसागर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचं पथक डॉक्टरांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचलं. ग्रामस्थांनी देखील मदतीसाठी धाव घेतली. अपघातामधील जखमींवर प्रथमोपचार करून रुग्णालयात पाठवण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात १८ भाविकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, टूरिस्ट बस वेगात होती. त्याचवेळी चालकाने नियंत्रण गमावल्याने टूरिस्ट बस थेट ट्रकला जाऊन धडकली.
अपघात झाल्यानंतर बस आणि ट्रकमध्ये अडकलेल्या भाविकांचे मृतदेह बाहेर काढताना बरेच प्रयत्न करावे लागले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. पोलिसांनी या गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अपघातानंतर रस्त्यावर एकच बघ्याची गर्दी जमा झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.