Rajasthan Husband-Wife News Saam TV
देश विदेश

Rajasthan Husband-Wife News : पतीनेच लावलं पत्नीचं 4 वेळा लग्न; कारण ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल

Crime News : आरोपी पती स्वत:च आपल्या पत्नीचा विवाह करुन देत असे आणि मुलाकडच्यांची लूट करत असे.

साम टिव्ही ब्युरो

Rajasthan News : राजस्थानमध्ये चोरीची अजब घटना समोर आली आहे. राजस्थान पोलिसांनी लुटमार करणाऱ्या 'बंटी-बबली'ला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी पती स्वत:च आपल्या पत्नीचा विवाह करुन देत असे आणि मुलाकडच्यांची लूट करत असे.

अलवर जिल्हा पोलिसांनी या लुटारू पती-पत्नीला अटक केली आहे. आतापर्यंत आरोपीने पत्नीचं चारवेळा लग्न केलं आहे. त्यासाठी आरोपी मुलांकडून मोठी रक्कमही घेत असे. लग्नानंतर काही दिवसांनी पत्नी संधी साधून घरात ठेवलेले दागिने व रोख रक्कम घेऊन पतीसह फरार होत असे, अशी एकंदर त्यांची चोरीची पद्धत होती. (Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, अलवर जिल्ह्यातील बानुसर येथील मीना परिसरात राहणारे हरिमोहन मीना (३६) यांचा विवाह आसाममधील दीप्ती नाथ हिच्याशी ३ जून रोजी झाला होता. मात्र काही दिवसांनंतर दिप्ती पळून जाईल असा संशय हरिमोहन यांना येत होता. त्याने ही गोष्ट त्यांनी घरातही सांगितली. (Latest News Marathi)

21 जून रोजी हरिमोहनचा संशय खरा ठरला. दिप्ती घरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. मात्र हरिमोहन भावाच्या सतर्कतेमुळे तिचा डाव फसला. दिप्ती आणि तिच्या आरोपी पती लोयकालिकाला घरच्यांना रंगेहात पकडलं. हरिमोहनच्या कुटुंबियांना पोलिसांना याबाबत कळवलं. त्यानंतर आरोपी पतीने दिप्तीलाच हरिमोहनच्या कुटुंबियांना फसवून इथे आणल्याचा आरोप केला.

पोलिसांनी तपास केला त्यावेळी दिप्ती आणि तिचा आरोपी पती लोयकालिका दोघे अशा पद्धतीने लोकांची फसवणूक करत होते असं आढळून आलं. आतापर्यंत त्याने दिप्तीचं चार वेळा लग्न लावलं आहे. (Latest Political News)

आरोपी दिप्तीशी लग्न करण्यासाठी मुलाच्या कुटुंबियांकडून तो मोठी रक्कम उकळत असे. याशिवाय काही दिवासांनी दिप्ती घरातील दागिने आणि पैसे घेऊन पळ काढत असे, अशी एकंदर दोघांची चोरीची पद्धत होती. मात्र यावेळी त्यांना प्लान फसला. सध्या पोलीस दोघांचीही चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT