Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Shruti Vilas Kadam

वैदेही परशुरामीचा देखणा लूक

वैदेही परशुरामीने तिचे वेगवेगळे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने फुलांसोबतचे सगळे फोटो पोस्ट पोस्ट केले आहेत.

Vaidehi Parshurami | Saam Tv

आकर्षक कॅप्शन

वैदेही परशुरामीने I can buy myself flowers असे सुंदर कॅप्शन या पोस्टला दिलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Vaidehi Parshurami

गळ्यातील चोकर नेकलेसने वाढवली शोभा

वैदेहीने गळ्यात सोनेरी रंगाचा आणि जांभळ्या खड्यांनी सजवलेला चोकर नेकलेस घातला आहे. या दागिन्यामुळे तिच्या साडीतील लूकला रॉयल टच मिळाला आहे.

Vaidehi Parshurami

मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेली हेअरस्टाइल

केसांचा सुंदर अंबाडा आणि त्याला लावलेली पांढऱ्या मोगऱ्याची फुलं तिच्या लूकला पारंपरिक मराठमोळा साज देतात. लग्नसमारंभ किंवा सणांसाठी ही हेअरस्टाइल उत्तम प्रेरणा ठरू शकते.

Vaidehi Parshurami

साध्या मेकअपमध्ये खुललं सौंदर्य

कपाळावरील छोटीशी टिकली, गुलाबी लिपस्टिक आणि सौम्य मेकअपमुळे वैदेहीचा चेहरा अधिक खुलून दिसतो. तिच्या या लूकमध्ये नैसर्गिक सौंदर्यावर भर दिलेला दिसतो.

Vaidehi Parshurami

वेस्टर्न लूकमध्येही दिसते स्टायलिश

दुसऱ्या फोटोमध्ये वैदेही गडद मरून रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसते. बागेतील रंगीबेरंगी फुलांच्या पार्श्वभूमीवर तिचं हसतं व्यक्तिमत्त्व आणि कॅज्युअल स्टाइल लक्ष वेधून घेते.

Vaidehi Parshurami

मरून साडीतील पारंपरिक अंदाजही खास

मरून रंगाची साडी, सोनेरी दागिने, फुलांनी सजवलेली वेणी आणि सुंदर नथ यांमुळे तिचा पारंपरिक लूक अधिक खुलतो. वैदेहीच्या वेगवेगळ्या स्टाइलमधील हे फोटो चाहत्यांसाठी फॅशन प्रेरणा ठरू शकतात.

Vaidehi Parshurami

Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

Shivali Parab | Saam Tv
येथे क्लिक करा