Sakshi Sunil Jadhav
१ कप तांदळाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ,अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप बेसन, पाणी, १ चमचा धणेपूड, १ चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद, हिंग, मीठ, १ चमचा मसाला, १ चमचा तेल, १ चमचा पांढरे तीळ आणि तेल इ.
सर्वप्रथम १ कप तांदळाचं पीठ घ्या. त्यामध्ये ज्वारीचं पीठ, बेसन मिक्स करून चाळून घ्या.
आता उकड काढण्यासाठी १ पातेल्यात १ कप पाणी, धणेपूड, जिरेपूड, मीठ, हिंग, हळद, मसाला आणि १ पळी तेल घाला.
आता पाण्यात पीठ मिक्स करून उकड तयार करून घ्या. मग त्यामध्ये पांढरे तीळ मिक्स करा. मग उकड झाकून ठेवा. मग ते मळून घ्या.
पीठ एकसारखा गोळा करून घ्या आणि चकलीच्या साच्यात घाला.
आता बटरपेपरवर चकल्या पाडून घ्या. चकल्यांची टोकं दाबून घ्या. पुढे तेल तापवून घ्या. गॅस स्लो असावा.
चकलीचा रंग बदलला आणि त्यावरचे बुडबुडे कमी झाले की चकली काढून सर्व्ह करा.