Sakshi Sunil Jadhav
सणासुदीच्या दिवसांमध्ये साडी नेसायला प्रत्येक महिलेला आवडतं. साड्यांमध्ये विशेष आकर्षण ब्लाउजचं असतं.
बऱ्याचदा महिलांना फॅशनेबल म्हणजे बॅकलेस, डीप नेक ब्लाउज आवडतात पण घालता येत नाहीत. याचं कारण म्हणजे पाठीवरचे आणि मानेवरचे डाग.
पुढे आपण पाठीवरचे डाग काढण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. त्याने सणासुदीला तुम्ही हवी तशी फॅशन करू शकता.
घाम आणि धूळ साचू नये म्हणून अंघोळ करताना पाठीची त्वचा सौम्य क्लिन्झरने स्वच्छ करा.
पाठीचा भाग उघडा राहणार असाल तर SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या ब्रॉड-स्पेक्ट्रमचे सनस्क्रीन लावा.
पाठीवरचा डाग घालवायला बऱ्याचदा महिला लिंबाचा रस लावतात. पण त्याने जळजळ होऊन डाग आणखी गडद होतात.
कोरफडीचे जेल त्वचेला ओलावा देऊ शकते. मात्र डाग कमी करण्यासाठी त्याचा ठोस पुरावा मर्यादित आहे.
पाठीवरील काळे डाग हे मुरुमांचे व्रण, बुरशीजन्य संसर्ग, घर्षण किंवा इतर त्वचेच्या समस्यांमुळे असू शकतात. त्यामुळे कारण समजून घेऊन उपचार करणे अधिक योग्य ठरते.