case register against ig level officer Saam Tv
देश विदेश

Shocking News: पोलिस महानिरीक्षकांवरच गंभीर गुन्हा दाखल; बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप

case register against ig level officer in rajasthan: राजस्थानमध्ये पोलिस महानिरीक्षकांवरच गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप केला.

Priya More

Summary -

  • राजस्थानमध्ये पोलिस महानिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल

  • महिलेने बलात्कार आणि धमकी दिल्याचे केले आरोप

  • या घटनेमुळे राजस्थान पोलिस दलात खळबळ

  • पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे

राजस्थान पोलिस महानिरीक्षक (मानवाधिकार) किशन सहाय यांच्यावर महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशन सहाय हे सध्या मानवाधिकार विभागात आयजी पदावर कार्यरत आहेत. पोलिस महानिरीक्षकाने बलात्कार आणि हल्ला केला तसंच जीवे मारण्याची देखील धमकी दिली असल्याचे ५३ वर्षीय महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले आहे.

पीडित महिलेने पोलिसांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीच्या आधारे मालवीय नगर पोलिस ठाण्यात आयजी किशन सहाय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा सध्या पोलिस तपास करत आहेत. पोलिस महानिरीक्षकांवर महिलेने केलेल्या या गंभीर आरोपामुळे राजस्थान पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेने आयजींवर आरोप केला की, त्यांनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शासकीय निवासस्थानी बोलावून जबरदस्तीने बलात्कार केला. तिने विरोध केल्यानंतर त्यांनी तिला मारहाण केली. कोणाकडे तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी त्यांनी धमकी दिली होती. महिलेच्या या तक्रारीची दखल घेत आयजींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावर बलात्काराच्या आरोपामुळे आणि गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. हे प्रककरण गांभीर्याने घेतलं जात असून त्याच्या प्रत्येक बाजूने तपास केला जात आहे. पोलिस सर्व बाबींची कसून चौकशी करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील खरी परिस्थिती समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पनवेलमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र, ठरवली पुढील रणनीती

साखरेचे दर पुन्हा कडाडणार! साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज; साखरेचे नेमके दर किती वाढणार?

Sheeps Won Thar: ना मेंढरं विकली, ना व्यवसाय सोडला! मेंढरांसोबतच घरी आली रुबाबदार थार

AI in Medical Science: माणूस 1400 वर्षे जगणार? AI माणसाला दीर्घायुषी करणार? AI मुळे वृद्धत्वाची प्रक्रिया थांबणार?

Mandar Kiwale Case: पाच दिवसआधीच ठरला किवळेच्या हत्येचा प्लॅन; आरोपींचं पोलिसांनाच खुलं आव्हान

SCROLL FOR NEXT