Rajasthan Railway Accident Saam Tv
देश विदेश

Rajasthan Railway Accident : साबरमती-आग्रा सुपरफास्ट एक्सप्रेसचे 4 डबे घसरले; प्रशासन घटनास्थळी दाखल, बचावकार्य सुरु

Sabarmati-Agra Express derailed: घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. पोलीस आणि इतर यंत्रणांनी बचाव कार्य सुरु केले आहे.

प्रविण वाकचौरे

Train Derail :

राजस्थानच्या अजमेरमध्ये सोमवारी पहाटे साबरमती-आग्रा सुपरफास्ट ट्रेनचे चार डबे रुळावरून घसरले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि इतर यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. पोलीस आणि इतर यंत्रणांनी बचाव कार्य सुरु केले आहे. (Accident News)

अजमेरमधील मदार रेल्वे स्थानकाजवळ रात्री 1 वाजेच्या सुमारास साबरमती-आग्रा सुपरफास्ट एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कसा झाला अपघात?

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लोको पायलटने ट्रेन थांबवण्यासाठी इमर्जन्सी ब्रेक लावला, पण तरीही मालगाडीला एक्सप्रेस धडकली. रुळावरून घसरल्यानंतर ट्रेन रुळावरून घसरली त्याचबरोबर विजेच्या खांबालाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

ट्रेन मालगाडीला धडकल्याने इंजिनसह चार जनरल डबे देखील रुळावरून घसरले. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आणि मदत कार्य सुरु केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमेर स्थानकातून निघाल्यानंतर काही अंतरावरच अचानक मोठा आवाज झाला. ट्रेन मालगाडीला धडकल्याने मोठा धक्का प्रवाशांना बसला. अनेक प्रवाशी झोपेत होते. मात्र धडक जोरदार असल्याने अनेक प्रवाशी सीटवरुन खाली पडले. काही वेळातच डब्यात आरडाओरड, धावपळ सुरु झाली. ट्रेनचा वेग कमी असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT