Pune News: खबरदार! अल्पवयीन मुलांच्या हातात कोयता दिसला तर पालकांची खैर नाही; पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Pune Crime News: शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या हातातही कोयते दिसत असल्याच्या घटना घडत आहेत. यावर आता पुणे पोलीस आयुक्तांनी कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
Pune Police amitesh Kumar
Pune Police amitesh Kumar Saam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे|ता. १७ मार्च २०२४

Pune Breaking News:

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यामध्ये वाहनांची तोडफोड, कोयता गँगची दहशत माजवल्याचे प्रकार सर्रास घडताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या हातातही कोयते दिसत असल्याच्या घटना घडत आहेत. यावर आता पुणे पोलीस आयुक्तांनी कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. (Crime News)

पुणे शहरात (Pune Crime) वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये पुणे पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलांकडून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वाहनांचे तोडफोडीच्या प्रकरणात सुद्धा मोठी वाढ होत आहे. याबाबतही पोलीस आयुक्त यांनी आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Police amitesh Kumar
Nanded News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडली; अर्धापूरमधील घटना

काय म्हणाले पुणे पोलीस आयुक्त?

"अल्पवयीन मुलांकडून जर कुठला गुन्हा घडत असेल तर त्याला प्रतिबंध करण्याचे काम त्यांच्या पालकांचे सुद्धा आहे. त्यामुळे जर अल्पवयीन मुलांकडून तोडफोडीचे गुन्हे घडले तर आता त्या मुलांच्या पालकांवर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे," अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे. तसचं पुण्यात कोयत्याने हल्ले रोखण्यासाठी शहरात कुठे कुठे कोयते विकले जातात यावरही लक्ष देण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

Pune Police amitesh Kumar
Sanjay Raut News: वंचितला सोबत घेतल्याशिवाय महाविकास आघाडी... संजय राऊतांचं मोठं विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com