Tragedy in Kota: 55-year-old woman dies after consuming cough syrup, investigation underway. saamtv
देश विदेश

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Cough Syrup Take One More Life: राजस्थानमधील कोटा येथे कफ सिरपने आणखी एकाचा जीव घेतल्याची घटना घडलीय. औषध प्यायल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाला. कप सिरप प्यायल्यानंतर आईची प्रकृती बिघडली आणि त्यामुळे तिचा रुग्णालयात मृत्यू झाला,असा आरोप एका मुलाने केलाय.

Bharat Jadhav

  • कफ सिरप प्यायल्यानंतर महिलेचा मृत्यू.

  • उपचारादरम्यान ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय.

  • दोन चमचे औषध घेतल्यानंतर प्रकृती बिघडली होती.

राजस्थानमधील कोटा येथेही कफ सिरपने आणखी एकाचा जीव घेतलाय. आता कोणी लहान मुलगा नाही तर एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. खोकला आणि सर्दी झाल्यानंतर महिलेने कप सिरपचं सेवन केलं होतं. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तेथे तिचा मृत्यू झाला, अशी माहिती महिलेच्या मुलाने माध्यमांना दिलीय.

कोटा शहरातील अनंतपुरा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडलीय. अजय आहुजा नगरमध्ये मृत महिला राहत होती. मागील रविवारी ही घटना घडली होती. ५५ वर्षीय कमला देवी यांच्या मुलाने आरोप केला की, त्यांच्या आईला खोकला आणि सर्दी झाली होती. त्यामुळे त्यांनी कफ सिरप घेतलं. पण सिरप प्यायल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी जास्त बिघडू लागली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कफ सिरप पिऊन महिलेचा मृत्यू

मृत महिलेचा मुलगा म्हणाला की, त्यांची आई दिवाळीसाठी साफसफाई करण्यात व्यस्त होत्या. याच दरम्यान तिला सर्दी झाली. आईची तब्येत बिघडल्यावर रंगबारी परिसरातील नगर मेडिकल स्टोअरमधून कफ सिरप आणले. दोन चमचे सिरप घेतल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तात्काळ न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी त्यांचा ईसीजी आणि इतर चाचण्या केल्या.

डॉक्टरांच्या मते, महिलेच्या हृदयाचे ठोके खूप कमी होते. उपचार सुरू करण्यात आले. पण निम्म रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. एसआय रोहित कुमार यांनी सांगितलं की, मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांनाकडे सोपवण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

SCROLL FOR NEXT