Rajasthan Hindustan Copper Limited Mine Saam Tv
देश विदेश

Rajasthan News: १३ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन, खाणीत अडकलेल्या १४ अधिकाऱ्यांची सुटका; एकाचा मृत्यू

Priya More

राजस्थानमधील (Rajasthan) झुंझुनू येथे कोलिहान खाण दुर्घटनेत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या खाणीमध्ये लिफ्ट कोसळून (Kolihan Mine Lift Collapse) अडकलेल्या १५ पैकी १४ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे. तर जखमी झालेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. १३ तासांपेक्षा जास्त वेळ या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. अखेर लिफ्टमध्ये अडकलेल्या १४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र उपेंद्र पांडे या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. आता खाणीत अडकलेल्या १५० मजुरांना बाहेर काढण्यात येणार आहे.

मंगळवारी कोलकात्याचे दक्षता पथक हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीत आले होते. खेत्री कॉपर कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. खाणीतील कामाची पाहणी केल्यानंतर मंगळवारी रात्री हे सर्वजण लिफ्टमधून वर येत होते. त्यावेळी अचानक लिफ्टची साखळी तुटली आणि लिफ्ट १८०० फूट खाली कोसळली. या लिफ्टमध्ये १५ अधिकारी अडकले होते. ते सर्वजण लिफ्टसोबत खाली पडले. यामधील अनेक जण जखमी झाले होते.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. १० तासांच्या प्रयत्नांनंतर ३ अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर १३ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. पण गंभीर जखमी झालेल्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर इतर जखमी अधिकाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेर काढण्यात आलेल्या अधिकाऱ्यांपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जयपूरला हलवण्यात आले आहे. त्याचवेळी बाहेर काढण्यात आलेल्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्टरांचे पथक आधीच तयार होते. सर्व जखमींना लिफ्टमधून बाहेर काढताच त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्यात आली. लिफ्ट कोसळलेल्या खाणीत १५० पेक्षा अधिक मजूर काम करत होते. लिफ्ट कोसळल्यामुळे ते खाणीमध्ये अडकले होते. आता या मजुरांनाही आता बाहेर काढण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT