RajaSthan News Saamtv
देश विदेश

Rajasthan CM Oath Ceremony: राजस्थानमध्ये 'भजनलाल' सरकार, शपथविधी सोहळ्याला मोदी शहांची उपस्थिती; राज्यात २ उपमुख्यमंत्री

Rajasthan CM Oath Ceremony: जयपुरच्या ऐतिहासिक अल्बर्ट हॉलच्या बाहेर हा सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही हजर होते. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.

Gangappa Pujari

Rajasthan CM Oath Ceremony:

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेले भजन लाल शर्मा यांनी आज (शुक्रवार, १५ डिसेंबर) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयपुरच्या ऐतिहासिक अल्बर्ट हॉलच्या बाहेर हा सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही हजर होते. पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते.

राजस्थानच्या (Rajasthan) नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा जयपूरमध्ये पार पडला. जयपुरच्या ऐतिहासिक अल्बर्ट हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तसेच दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अमित शहा भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. तसेच 6 राज्यांचे मुख्यमंत्रीही सोहळ्यात सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजेही व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्रिमंडळात 2 नवीन मंत्री

भजनलाल शर्मा यांच्याशिवाय आज आमदार दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी मंत्रिमंडळ सदस्य म्हणून शपथ घेतली. भारतीय जनता पक्षाने (भाजप) दोघांनाही उपमुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारी दिली होती. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी या तिन्ही नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT