Parliament Security Breach Accused Lalit Jha Arrest
Parliament Security Breach Accused Lalit Jha ArrestSaam Tv

Parliament Attack Update : ललित झा राजस्थानला का पळून गेला? कारण आलं समोर, पण पोलिसांसमोरील प्रश्न वाढले

Parliament Security Breach : बुधवारी संसद भवनात घडलेल्या घटनेनंतर ललितने गुरुवारी सकाळीच सर्व फोन नष्ट केले होते. मात्र, पोलिसांना याबाबत साशंकता आहे, त्यामुळे याबाबत पोलीस सखोल चौकशीच्या तयारीत आहेत.
Published on

Delhi News :

संसद भवनात घुसखोरी करत 'स्मोक' कांड करणाऱ्यांचा सूत्रधार ललित झाने पोलिसांसमोर सरेंडर केलं आहे. हा सगळा प्रकार घडला त्याने ललित देखील संसद भवन आवारातच होता. मात्र घटनेनंतर निदर्शने करणाऱ्या चारही लोकांचे मोबाईल घेऊन तो पळून गेला होता. मात्र ललितने सरेंडर केल्यानंतर एकही मोबाईल त्याच्याजवळ सापडला नाही. (Latest Marathi News)

सूत्रांच्या माहितीनुसार, राजस्थानहून दिल्लीत येऊन सरेंडर करण्याआधी ललितने चारही मोबाईल फोन नष्ट केले. दिल्लीतून पळून गेल्यानंतर ललित कुचामन (राजस्थान) येथे गेला त्याचा मित्र महेशला भेटला होता. महेशनेच ललितला एक खोली मिळवून दिली.

बुधवारी संसद भवनात घडलेल्या घटनेनंतर ललितने गुरुवारी सकाळीच सर्व फोन नष्ट केले होते. मात्र, पोलिसांना याबाबत साशंकता आहे, त्यामुळे याबाबत पोलीस सखोल चौकशीच्या तयारीत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Parliament Security Breach Accused Lalit Jha Arrest
Lalit Jha Arrest: संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड 'ललित झा'ला अटक, दिल्ली पोलिसांना मोठे यश

पोलिसांना नष्ट झालेला फोनही जप्त करायचा आहेत. पोलीस आता कोणत्याही परिस्थितीत चार आरोपींचे फोन जप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्पेशल सेलची टीम आज महेश आणि ललितला कोर्टात हजर करून रिमांड मागणार आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

तपासात अडथळे आणण्यासाठी ललित खोटे बोलत असल्याचा पोलिसांना संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी महेशच्या चुलत भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याचवेळी महेश आणि ललित सरेंडर करण्यासाठी दिल्लीत येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली.

Parliament Security Breach Accused Lalit Jha Arrest
Parliament Security Breach : 'ही गंभीर बाब आहे, विरोधक राजकारण करत आहेत', अमित शाह यांनी विरोधकांना सुनावलं

ललितनेच दिले होते फोन

संसदेत जाण्यापूर्वी आणि आंदोलनापूर्वी चार आरोपी मनोरंजन, सागर, नीलम आणि अमोल यांनी ललित झा कडे सर्व फोन दिले होते. ललित झा बाहेरच्या गर्दीत सामील होऊन त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. स्मॉग कॅनसह आंदोलन करणाऱ्या चारही जणांना पोलिसांनी पकडताच ललित झा सर्वांचे मोबाईल घेऊन तेथून पळून गेला. ललित झा याने संसद भवनातील निषेधाचा व्हिडिओ ज्या एनजीओसाठी तो काम करत होता त्याच्या मालकाला पाठवला होता, असेही तपासात समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com