BJP Leader Dr Jaswant Singh Yadav Passes Away 
देश विदेश

दिवाळीच्या दिवशीच भाजपवर शोककळा! दिग्गज आमदाराचे निधन; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

BJP Leader Passes Away : राजस्थान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डॉ. जसवंत सिंह यादव यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी जयपूर येथे निधन झाले. प्रोस्टेट कर्करोगाशी त्यांची झुंज सुरू होती. चार वेळा आमदार आणि एकदा खासदार म्हणून निवडून आलेल्या यादव यांच्या निधनाने राजस्थानच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Namdeo Kumbhar

BJP Leader Dr Jaswant Singh Yadav Passes Away : राजस्थान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डॉ. जसवंत सिंह यादव यांचे निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांना प्रोस्टेट कर्करोगाशी लढा सुरू होता. जयपूर येथील महात्मा गांधी रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच बहरोड, अलवरसह संपूर्ण राजस्थानच्या राजकीय वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे.

रुग्णालयात उपचार सुरू होते:

काही दिवसांपूर्वी अचानक प्रकृती खालावल्यामुळे डॉ. जसवंत सिंह यांना जयपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही.

राजकारणातील मोठे योगदान:

डॉ. जसवंत सिंह यादव हे राजस्थानच्या राजकारणातील एक मातब्बर आणि लोकप्रिय चेहरा मानले जात होते. बहरोड आणि अलवर परिसरात त्यांचा मोठा जनाधार होता. त्यांनी भाजप सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. त्यांच्या जाण्याने पक्षाने एक मुत्सद्दी आणि जनतेशी नाळ जोडलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या विविध वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

डॉ. जसवंत यादव यांची राजकीय कारकीर्द अत्यंत यशस्वी आणि प्रभावशाली राहिली. आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात ते चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. आपली आक्रमक शैली, थेट जनतेशी असलेला संपर्क आणि तळागाळातील लोकांमध्ये असलेली मजबूत पकड यामुळे त्यांनी राजस्थानच्या राजकारणात स्वतःची एक वेगळी आणि भक्कम ओळख निर्माण केली होती. राज्य सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या परिसराच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : दिवाळीआधी सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! आठवडाभरात किती महागलं सोनं? पाहा २२, २४ कॅरेटचे भाव

Nagpur : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Women Health Tests : प्रत्येक महिलेने वर्षातून एकदा आवर्जून कराव्यात 'या' ६ मेडिकल टेस्ट, आजारांचा धोका वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: खेड तालुक्यातील खुरपुडी खुर्दच्या शेतशिवारात बिबट्या दिसला

Instant Chakli Recipe : दिवाळीसाठी इन्स्टंट चकली रेसिपी, भाजणीशिवायही होईल तितकीच कुरकुरीत

SCROLL FOR NEXT