Bharatpur News Saam Tv
देश विदेश

Bharatpur News: दारू मागायला आलेल्या तरुणाला दुकानदाराने दिले अ‍ॅसिड, तब्येत बिघडली अन्...

Bharatpur Crime News: मृत्यूपूर्वी तरुणाने पोलिसांना जे काही सांगितले ते ऐकून पोलीस देखील चक्रवाले...

Shivani Tichkule

Rajashtan News: राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील सिकरी पोलीस स्टेशन हद्दीतील गुलपाडा गावात एका तरुणाला दारूऐवजी अ‍ॅसिड दिल्याची घटना समोर आली आहे. अ‍ॅसिडचे सेवन केल्यामुळे तरुणाची तब्येत बिघडल्याने त्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, दिवस उपचार घेतल्यानंतर या तरुणाचा मृत्यू झाला. इर्शाद असे मृत तरुणाचे नाव असून त्यांचे वय 31 वर्षे होते. (Latest Marathi News)

ही घटना 1 मे रोजी घडली होती. राजस्थानमधील (Rajasthan) सिकरी या ठिकाणी ही घटना घडली आहे. पोलिसांनी (Police) या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. मृत्यूपूर्वी या तरुणाने पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.

या तरुणाने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे की, '1 मे रोजी गावात लग्नसमारंभ होता, त्यावेळी इर्शाद दारूच्या नशेत डीजेवर नाचत होता. इर्शादला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे इर्शाद गावातच सत्तू सरदार नावाच्या दारू विक्रेत्याकडे गेलो. सत्तू सरदारने मला दारूऐवजी अ‍ॅसिड प्यायला लावले. ते प्यायल्यानंतर माझी तब्येत बिघडू लागली.

इर्शादची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी इर्शादला सरकारी रुग्णालयात नेले, मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला अलवरला रेफर केले. इर्शाद यांच्यावर काही दिवस अल्वरमध्ये उपचार करण्यात आले मात्र त्यानंतर प्रकृती अजून गंभीर झाल्याने त्याला अलवरहून जयपूरला (Jaipur) रेफर करण्यात आले. इर्शादवर जयपूरमध्ये उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याला गावात आणण्यात आले. (Crime News)

मात्र, 10 मे रोजी इर्शादची प्रकृती पुन्हा ढासळू लागली. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला भरतपूरच्या आरबीएम रुग्णालयात दाखल केले आणि 11 तारखेला इर्शादच्या नातेवाईकांनी सिकरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी 11 मे रोजी इर्शादचा जबाब नोंदवला आणि 12 मे रोजी दाखल करण्यात आला. तेव्हापासून इरसद यांच्यावर आरबीएम रुग्णालयात उपचार सुरू होते.

त्याच दिवशी रात्री उशिरा इर्शादची तब्येत अचानक बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला.इर्शादचे वडील मेहबूब यांनी सांगितले की, गावातील सत्तू सरकार यांचे इर्शादशी जुने वाद होते. त्यामुळेच त्याने इर्शादला दारूमध्ये अ‍ॅसिड मिसळून प्यायला लावले. सध्या इर्शादच्या जबानीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. इर्शादने मृत्यूपूर्वी जबाब नोंदवल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाहेर कॉम्प्यूटर सेंटरचं पोस्टर, आत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी तरूणींना रंगेहाथ पकडलं

Curd Water : दह्याला सुटलेले पाणी प्यावे की टाकून द्यावे? वाचा तज्ज्ञांचे मत

Weekly Horoscope : मिथुन, मीनसह ७ राशींना पूर्वजांचा आशीर्वाद; खुलणार करिअरचे दरवाजे; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Dark Chocolate Cake: वजन आणि हृदयासाठी फायदेशीर डार्क चॉकलेट केक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

India Tourism: खंडाळ्याला हमखास विसराल! वसईपासून ५ तासांच्या अंतरावर आहे 'हे' सुंदर पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT