Manasvi Choudhary
मानवी शरीराचा ६० ते ७० टक्के भाग पाण्याने बनलेला आहे. शरीराचे कार्य सुरळीत आणि ताजेतवाने चालण्यासाठी पुरेसे पाणी असणे महत्वाचे आहे.
मात्र आजकाला कामाच्या धावपळीत अनेकजण पाणी पिणे टाळतात. तहान लागल्याशिवाय पाणी पित नाही. मात्र यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.
जेव्हा तीव्र तहान लागते, तेव्हा शरीर आतून सुकत चालल्याचे संकेत देते ती 5 लक्षणे कोणती जाणून घ्या.
तहान लागणे हे शरीराचे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे संकेत आहे की, आता पाण्याची गरज आहे. यासाठी खूप तहान लागेपर्यंत किंवा तोंड पूर्ण सुकेपर्यंत कधीही थांबू नका.
जर तुमची लघवी गडद पिवळी किंवा केशरी रंगाची होत असेल, तर हे लक्षण तुमच्या शरीरात पाण्याची तीव्र कमतरता आहे हे दर्शवते.
पाण्याच्या अभावामुळे रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यास अडचणी येतात. परिणामी, कोणतीही कष्टाची कामे न करताही सतत थकवा जाणवू लागतो.
शरीरात पाण्याची पातळी अचानक कमी झाल्यास मेंदूतील रक्तवाहिन्यांवर ताण येतो, ज्यामुळे तीव्र डोकेदुखी किंवा चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो.
लाळेचे प्रमाण कमी झाल्यामुळे तोंड कोरडे पडणे, ओठ फाटणे आणि त्वचा निर्जीव किंवा रखरखीत वाटते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.