Kitchen Gas Safety Tips: भांडी काळी पडताहेत आणि गॅस पटकन संपतोय? मग तुमच्या स्वयंपाकघरात घडतंय काहीतरी खतरनाक

Manasvi Choudhary

गॅसचा वापर

किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी गॅसचा वापर केला जातो. मात्र अनेकदा गॅसवर जेवण बनवल्यानंतर भांडी काळी पडतात किंवा गॅस अपेक्षेपेक्षा खूप लवकर संपतो.

Kitchen Gas Safety Tips

बर्नरमध्ये किंवा गॅसच्या प्रक्रियेत बिघाड

यामागे केवळ जेवण बनवण्याची वेळ महत्वाची नसून, बर्नरमध्ये किंवा गॅसच्या प्रक्रियेत काहीतरी बिघाड असण्याचे मोठे कारण लपलेले असते. ते लक्षात घेणे महत्वाचे आहे.

Kitchen Gas Safety Tips

बर्नरच्या छिद्रांमध्ये घाण साचणे

रोजच्या स्वयंपाकामुळे बर्नरच्या छोट्या छिद्रांवर तेल, अन्नाचे कण किंवा उरलेले दूध साचून राहते. यामुळे गॅसचा प्रवाह असमान होतो आणि ज्योतीचा रंग निळ्यावरून पिवळा पडतो.

Kitchen Gas Safety Tips

पुरेसे ऑक्सिजन न मिळणे

गॅस सुरळीत जळण्यासाठी गॅस आणि हवेचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. बर्नरमध्ये हवा मिळण्याची जागा ब्लॉक झाली तर अपुऱ्या ऑक्सिजनमुळे गॅस नीट जळत नाही आणि पिवळी किंवा नारंगी ज्योत तयार होते.

Kitchen Gas Safety Tips

कार्बन मोनोऑक्साइड तयार होण्याचा धोका

जेव्हा गॅस योग्य प्रकारे जळत नाही, तेव्हा 'कार्बन मोनोऑक्साइड' हा विषारी वायू तयार होण्याचा धोका असतो. या विषारी वायूला कोणताही रंग किंवा वास नसतो, जो आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.

Kitchen Gas Safety Tips

भांडी काळी पडणे आणि गॅसचा अपव्यय

पिवळ्या ज्योतीमुळे भांड्याच्या तळाशी काजळी जमा होते, ज्यामुळे भांडी काळी पडतात. तसेच गॅस जास्त प्रमाणात खर्च होतो आणि गॅस सिलिंडर पटकन संपतो.

Kitchen Gas Safety Tips | Google

या गोष्टी लक्षात ठेवा

१) जर गॅसची ज्योत बराच वेळ पिवळी राहत असेल तर बर्नरची स्वच्छता तपासा. ज्योत पिवळीच राहिल्यास त्याची तपासणी करा.

२) जर गॅसमुळे भांडी काळी पडत असेल तर बर्नरमध्ये समस्या असू शकते ते तपासून घ्या.

३) गॅसचा वापर अचानक वाढला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Kitchen Gas Safety Tips

NEXT: Short Kurti Designs: महिलांसाठी शॉर्ट कुर्तीच्या लेटेस्ट डिझाईन, बॅकलेसपासून ते हॉल्टरनेकपर्यंत हे 5 पॅटर्न ट्रेंडमध्ये

Short Kurti Designs
येथे क्लिक करा..