Rajasthan Politics Saam Digital
देश विदेश

Rajasthan Politics: भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, २२ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, कोणाकडे कोणती जबाबदारी?

Sandeep Gawade

Rajasthan Politics

राजस्थानमध्ये शनिवारी भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या २२ जणांना शपथ दिली. राज्यवर्धन राठोड, किरोरीलाल मीणा यांच्यासह गजेंद्र सिंह खिमसर, बाबुलाल खराडी, जोगाराम पटेल, जोराराम कुमावत, सुरेश सिंह आणि मदन दिलावर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये भाजपने ११५ जागा जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला ६९ जागांवर विजय मिळवता आला आहे. २०० पैकी १९९ जागांवर मतदान झाले होते. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली. निवडणुकीतील विजयानंतर भाजपने भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालून सर्वांनाच चकीत करून सोडले होते. १५ डिसेंबरलाच त्यांनी शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मंत्रिमंडळाच्या विस्तारातून प्रादेशिक समतोल साधण्याची भाजपची रणनीती असेल. २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतायेत. सध्या मध्य प्रदेशात लोकसभेच्या २९, राजस्थानमध्ये २५ आणि छत्तीसगडमध्ये ११ जागा आहेत. २०१८ मध्ये या तिन्ही राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. तरीही लोकसभा निवडणुकीत भाजपने ६५ पैकी ६१ जागा जिंकल्या होत्या. यावेळीही जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा मानस भाजपचा असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

Prajakta Mali Phullwanti Dance: प्राजक्ता माळी शिकवतेय स्टेप बाय स्टेप डान्स; Video पाहिलात का?

SCROLL FOR NEXT