RAJASTHAN ACCIDENT saam tv
देश विदेश

प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्यासह दोन मुलांचं अपघाती निधन; महामार्गावर कारचा चक्काचूर

Rajasthan Speeding Truck Collides With Car Killing Family Of Four: राजस्थानच्या बारां जिल्ह्यात कवाई-अटरु राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने कारला समोरून धडक दिल्याने डॉक्टर दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

राजस्थानच्या बारां जिल्हयात कवाई-अटरु राज्य महामार्गावर मंगळवारी भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिल्याने डॉक्टर दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. कवाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात डॉ.सुरेश गजराज (38), त्यांच्या पत्नी डॉ.शालिनी मौर्य (35), 12 वर्षांचा मुलगा स्वप्नील आणि 7 वर्षांची मुलगी निलिशा यांचा मृत्यू झाला. हे कुटुंब मूळचे झुंझूनू जिल्ह्यातील सुरजगड येथील असून सध्या जयपूरमध्ये राहत होते. ते कारने छबरा येथे जात असताना हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजता हा अपघात झाला. ट्रकची धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिलीआणि कारमध्ये अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारचा ढिगारा हटवून चारही मृतदेह अटरू उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात हलवले. रुग्णालयातील डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केले. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना माहिती दिली असून, त्यांच्या आगमनानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, अपघाताचा तपास सुरू असून फरार ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

भाजपकडून अधिकृतरित्या 4 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर शिवसेनेसह इतर पक्षांकडून तब्बल 35 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, भाजपचे चार उमेदवार वगळता शिवसेना आणि इतर पक्षांसाठी केवळ तीन जागा उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे या तीन जागांसाठी तब्बल 35 अर्ज आल्याने इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.यापूर्वी अर्ज दाखल करण्यासाठी महापालिका परिसरात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं होतं. यावेळी काही काळ धक्काबुक्कीची परिस्थितीही निर्माण झाली होती. आता 24 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष महासभेत या सात स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार असून, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AC Vastu Tips: घरामध्ये एसी कोणत्या दिशेला असावा? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या

Maharashtra News Live Update: गडचिरोलीच्या अतिदुर्गम लष्कर, गोपणार गावांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

7 स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन अन् धक्काबुक्की; महापालिकेत गोंधळ

Maharashtra : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेली 'ही' ७ स्वर्गासारखी सुंदर गावे, सुट्टीत एकदा नक्की फिरून या

Wednesday Horoscope: ‘या’ ४ राशींच्या नशिबात मोठा बदल; धनलाभासह मिळणार खास संधी!

SCROLL FOR NEXT