Rajasthan Assembly Election 2023 Results Saam Tv
देश विदेश

Rajasthan Election Results: काँग्रेस सत्ता राखणार की भाजप बाजी मारणार? रविवारी निकाल कधी, कुठे आणि कसे पाहता येतील? जाणून घ्या

Satish Kengar

Rajasthan Assembly Election 2023 Results :

राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांच्यासह 1,862 उमेदवारांच्या भवितव्यचा फैसला रविवारी होणार आहे. राज्यात 25 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते, त्यानंतर आज म्हणजे रविवारी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. रविवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी निवडणुकीत 200 पैकी 199 विधानसभा मतदारसंघात 75.45 टक्के मतदान झाले होते, जे 2018 च्या निवडणुकीपेक्षा 0.73 टक्के अधिक होतं. येथे 200 विधानसभा क्षेत्रांपैकी 199 मध्ये मतदान झाले, श्रीगंगानगरच्या करणपूर जागेवरील निवडणूक सत्ताधारी काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांच्या दुर्दैवी निधनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रत्येक पाच वर्षात बदललं सरकार

राजस्थानमध्ये निवडणुकीची एक वेगळीच परंपरा आहे. येथे 1993 पासून कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा राज्यात सरकार स्थापन करता आलेलं नाही. राज्यात आळीपाळीने कधी भाजप तर कधी काँग्रेसचं सरकार आलं आहे. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजय झाला होता, यानंतर अशोक गेहलोत हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवडणून आले होते. (Latest Marathi News)

एक्झिट पोल कोणाच्या बाजूने?

एक्झिट पोलने राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर होताना दिसत असली तरी, काँग्रेसचं सरकार जाताना आणि भाजप सत्तेत येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलस्टार्टच्या एक्झिट पोलमध्येही भाजपला राजस्थानमध्ये आघाडी मिळाल्याचे दिसून आले आहे. भाजपला 100 ते 110 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळतील, असे सांगितले जात आहे.

न्यूज 18 च्या एक्झिट पोलने राजस्थानमध्ये भाजपला 111 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काँग्रेसला 74 तर इतरांना 14 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुत मिळत असल्याचं अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात भाजपला 108-128 , काँग्रेसला 56-72 आणि इतर पक्षांना 13-21 जागा मिळताना दिसत आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल कधी, कुठे आणि कसे पाहता येतील?

रविवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार असून, सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या अपडेट्ससाठी, तुमच्याकडे एक्सप्लोर करण्यासाठी अनेक विश्वसनीय पर्याय आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट, वृत्तवाहिन्या, साम टीव्ही आणि साम टीव्ही डिजिटलवर तुम्ही निवडणुकीशी संबंधित प्रत्येक अपडेट मिळवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT