Chhattisgarh Election Counting
Chhattisgarh Election Counting Saam Tv

Chhattisgarh Election Results: भूपेश बघेल यांचं सरकार राहणार की भाजपचं कमळ फुलणार? काय होऊ शकतं? वाचा

Chhattisgarh Election Counting : छत्तीसगडमधील सर्व ९० विधानसभा जागांचे निकाल आज रविवारी लागत आहेत. निकालापूर्वी राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. राज्यातील निवडणुकीचे निकाल सर्वात प्रथम तुमच्या हाती येणार आहेत. यासाठी निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था केलीय.
Published on

Chhattisgarh Assembly Election Counting Results 2023:

छत्तीसगडमधील सर्व ९० विधानसभा जागांचे निकाल आज रविवारी लागत आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निकालापूर्वी राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. दरम्यान छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात चार प्रमुख दावेदार पक्ष आहेत. भाजप, काँग्रेस, जनता काँग्रेस छत्तीसगड (JCC) आणि बहुजन समाज पक्ष (BSP),गोंडवाना गणतंत्र पार्टी (जीजीपी), हमर राज पार्टी (एचआरपी) आणि डावे पक्ष यांसारखे इतर प्रादेशिक पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.(Latest News)

कुठे पाहणार निकाल

निवडणूक आयोगाच्या वेबसाइट आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर तुम्ही मतमोजणीचे निकाल पाहू शकता. मतमोजणीची प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यानंतर निकाल ऑनलाइन अपडेट केले जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी रीना बाबासाहेब कंगाळे यांनी दिलीय. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने वेब-आधारित एन्कोर अ‍ॅप्लिकेशन तयार केलं आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर रिटर्निंग ऑफिसर यात निकाल अपडेट करतील. यासाठी तुम्हाला https://results.eci.gov.in/वर भेट द्यावी लागेल. याशिवाय आयोगाच्या व्होटर हेल्प लाईन अ‍ॅप्लिकेशनवरही निवडणुकीचे निकाल पाहता येतील.

कडेकोट व्यवस्था

मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय. प्रत्येक स्तरावर ओळखपत्रे तपासल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. मतमोजणी आणि टॅब्युलेशनची संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली जाणार आहे. मतमोजणीच्या वेळी हॉलमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास परवानगी नसेल. इतकेच नाहीतर पान मसाला आणि सिगारेट घेऊन जाण्यास देखील मज्जाव केला जाणार आहे.

प्रत्येक टप्प्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतांच्या मोजणीसाठी १४ टेबलांची व्यवस्था करण्यात आलीय. याशिवाय सहा विधानसभेच्या जागांसाठी २१ टेबल मंजूर करण्यात आले आहेत, ज्यात पंडारिया, काक्योन, सरगढ, मिलायगर, कसडोल आणि मस्तापूर-सोनहाट यांचा समावेश असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.

राज्यात दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले. छत्तीसगड विधानसभेच्या एकूण ९० जागांसाठी झालेलं मतदान ७ आणि १७ नोव्हेंबरला घेण्यात आलं. दरम्यान या मतदानाचा एक्झिट पोल निकाल ३० नोव्हेंबर रोजी समोर आला. यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत असल्याचं दिसत आहे. दोन्ही पक्षांना सत्ता स्थापनेची समान संधी आहे. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार, बहुतांश आकडेवारीत काँग्रेस पक्षाची पकड मजबूत असल्याचे दिसून येत आहे.

परंतु एक्झिट पोलनंतर काँग्रेसमधील नेत्यांची चिंता वाढलीय. सर्व्हेमध्ये निकाल काँग्रेसच्या बाजूने लागत असल्याचं दिसत असताना सुद्धा कमी जागांमुळे पक्षाचे नेते अस्वस्थ आहेत. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला सरासरी ४० ते ५५ जागा मिळताना दिसत आहे. तर भाजपला ३५ ते ४६ जागा मिळू शकतात. राज्यात सरकार स्थापनेसाठी फक्त ४६ जागांची आवश्यकता आहे.

Chhattisgarh Election Counting
Chhattisgarh Election: छत्तीसगड निवडणुकीसाठी काँग्रेसने 53 उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर, कोणाला कुठून मिळालं तिकीट?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com