TRAGIC ALWAR INCIDENT TWO SISTERS DIE AFTER SUFFOCATING INSIDE LOCKED CAR Saam Tv
देश विदेश

Shocking : चिमुकल्या बहिणी खेळता खेळता कारमध्ये गेल्या, दरवाजा बंद केला अन् भयंकर घडलं

Rajasthan News : राजस्थानातील अलवर येथे खेळताना दोन लहान बहिणी जुन्या गाडीत अडकल्या आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • अलवरमध्ये खेळताना दोन बहिणी जुन्या कारमध्ये अडकल्या

  • गाडीत हवा न मिळाल्याने गुदमरून दोघींचा मृत्यू

  • शोध घेताना कुटुंबीयांना त्या बेशुद्ध अवस्थेत सापडल्या

  • पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू

राजस्थानमधून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. खेळता खेळता दोन बहिणी गाडीत अडकल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजस्थानातील अलवर जिल्ह्यात ही घटना घडली. मुलींच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अलवरच्या खुदानपुरी भागात बुधवारी घडली. मृत मुलींमध्ये आठ वर्षांची टीना आणि पाच वर्षांची लक्ष्मी यांचा समावेश आहे. दोन्ही बहिणी घराजवळ खेळत असताना जवळच उभी असलेल्या एका जुन्या कारमध्ये शिरल्या. ही कार अनेक वर्षांपासून वापरात नसून तिची बॅटरी आणि इंजिनही निकामी झाले होते.

दरम्यान, खेळताना मुलींनी कारचा दरवाजा आतून बंद केला. मात्र, दरवाजा पुन्हा उघडता न आल्याने त्या गाडीतच अडकून पडल्या. गाडी बंद असल्याने आतमध्ये हवा खेळती राहिली नाही आणि गुदमरल्याने दोन्ही मुली बेशुद्ध झाल्या.काही वेळाने मुली दिसत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

शोध घेत असताना गाडीजवळ गेल्यावर मुली आत बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. स्थानिकांच्या मदतीने गाडीचा दरवाजा उघडण्यात आला आणि तत्काळ मुलींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मुलींचे वडील रमेश यांनी सांगितले की, ते सकाळी ११ वाजता दुकानात गेले होते, तर त्यांची पत्नी घरकामात व्यस्त होती. याच दरम्यान हा दुर्दैवी अपघात घडला. वैशाली नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी गुरुदत्त सैनी यांनी सांगितले की, संबंधित गाडी जुनी असून अनेक वर्षांपासून उभी होती. दरवाजे उघडे असल्याने मुलींना आत जाणे सोपे झाले आणि ही घटना घडली. दरम्यान या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उन्हाचा पारा 43 अंशावर..भर उन्हात शेतकरी डिझेलसाठी पेट्रोल पंपाबाहेर उभे..

NCP Leader Arrested: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याला पुण्यातून अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Pune Acid Attack : पुण्यात थरकाप! लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात भयानक कृत्य; पोलिसांनी कर्नाटकातून कशा आवळल्या मुसक्या?

Sour Burps Causes: सकाळी उठल्यावर आंबट ढेकर येतायत? एसिडिटी नाही तर लिव्हर खराब होण्याचे हे आहेत 6 संकेत

MLC Election: विधानपरिषद निवडणुकीत महायुतीत ठिणगी; शिंदेसेनेच्या जागेवर भाजपचा दावा

SCROLL FOR NEXT