Raja Raghuvanshi Honeymoon Murder Saam Tv News
देश विदेश

Raja Raghuvanshi: २० लाख रुपये देईन..., राजाला संपवण्यासाठी कुऱ्हाड ऑनलाईन मागवली; सोनमने कशी केली सुपारी किलर्ससोबत डील?

Raja Raghuvanshi Honeymoon: राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली. आरोपींमध्ये राजाची बायको सोनमचा देखील सहभाग आहे. सोनमने बॉयफ्रेंडच्या मदतीने राजाच्या हत्येचा कट रचला. शिलाँगमध्ये हनिमूनसाठी नेऊन हत्या करण्यात आली.

Priya More

इंदुरच्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात त्याची बायको सोनमला अटक झाल्यापासून एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत आहेत. सोज्वळ सुनेचा आव आणणाऱ्या सोनमचा खरा चेहरा आता सर्वांसमोर आला आहे. सोनमनेच आपल्या नवऱ्याच्या हत्येसाठी सुपारी दिली होती. तिने राजाच्या हत्येसाठी बॉयफ्रेंडसोबत कट रचला. इंदूरपासून जवळपास २००० किमी अंतरावर असलेल्या शिलाँगमध्ये सोनमने राजाला संपवलं. महत्वाचे म्हणजे राजाच्या हत्येसाठी तिने ऑनलाईन कुऱ्हाड मागवली होती. सोनमने राजाच्या मारेकऱ्यांना किती रुपायांची सुपारी दिली होती? याची माहिती आरोपींनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितली.

सोनम आणि राजाचे लग्न ११ मे रोजी झाले होते. लग्नाच्या ६ दिवसांनंतर सोनमने बॉयफ्रेंड राज कुशवाहसोबत राजाला मारण्याचा प्लान तयार केला. सोनमने राजाला हनिमूनसाठी शिलाँगला जाण्यासाठी विनंती केली. बायकोच्या हट्टापुढे राजा देखील शिलाँगला जाण्यासाठी तयार झाला. राजाला मारण्यासाठी सोनम आणि राजने ३ जणांना सुपारी दिली होती.

राजाला मारण्यासाठी आसाममधील गुवाहाटीमध्ये 3 कॉन्ट्रॅक्ट किलर आधीच उपस्थित होते. या राजा आणि सोनम ज्या ज्या ठिकाणी जात होते तिथे हे तिघे जण जायचे. त्यांनी गुवाहाटीमध्येच ऑनलाइन कुऱ्हाड ऑर्डर केली. या कुऱ्हाडीने राजाची हत्या करण्यात आली. सोनम आणि राजा शिलाँगला पोहोचले तेव्हा सोनमने त्यांना लोकेशन पाठवले आणि आरोपी त्यांच्यापासून फक्त १ किमी अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये राहत होते.

आरोपींनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, २३ मे रोजी फोटोशूटच्या बहाण्याने सोनम राजाला कोरसा परिसरातील एका टेकडीवर घेऊन गेली. सोनमने जाणूनबुजून थकल्याचे नाटक केले आणि त्यांच्या मागे चालू लागली. त्यावेळी तिघेही आरोपी राजासोबत चालत होते. टेकडी चढताना आरोपी देखील थकले तेव्हा त्यांनी राजाला मारण्यास नकार दिला. यावर सोनमने राजाच्या पर्समधून १५ हजार रुपये काढून आरोपीला दिले आणि म्हणाली, 'तुम्हाला त्याला मारावे लागेल.' सोनमने काम झाल्यानंतर २० लाख रुपये देण्याचे त्यांना आश्वासनही दिले होते.

शनिवारी मेघालय पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाला ज्यामध्ये सोनम राजापासून थोड्या अंतरावर उभी होती आणि फोनवर कोणाशी तरी गप्पा मारत होती. पोलिसांनी सोनमचे कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा त्यांना आरोपींची माहिती मिळाली. सर्व आरोपींचे लोकेशन इंदूरमध्ये आढळले त्यानंतर पोलिस ताबडतोब अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. राजाची हत्या झाल्यानंतर सोनम फरार झाली होती. जेव्हा तिला तिच्या बॉयफ्रेंडसह सर्व आरोपींना अटक झाल्याचे कळाले तेव्हा तिने गाजीपूरमध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT