Raja Raghuvanshi Case Saam TV News
देश विदेश

Raja Raghuvanshi: राजाला मारू, मी विधवा झाल्यावर आपण लग्न करू मग..., राजच्या प्रेमात वेडी झाली होती सोनम

Raja And Sonam Raghuvanshi: राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सोनमला राज कुशवाहसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे तिने नवरा राजा रघुवंशी यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

Priya More

राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. राजाची हत्या त्याची बायको सोनमने केली. सोनमने बॉयफ्रेंडसोबत राजाच्या हत्येचा कट रचला. सोनमचे राज कुशवाह या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याच्यासोबत लग्न करण्यासाठीच सोनमने राजची हत्या केली. या हत्याकांडाचा तपास करत असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोनमने राजची हत्या करण्यापूर्वी राजला लग्नाचं प्रॉमिस केले होते.

सोनमच्या वडिलांचे प्लायवूडचे दुकान होते. या दुकानात राज कुशवाह हा तरूण काम करत होता. सोनम याच राजच्या प्रेमात वेडी झाली होती. राज सोनमपेक्षा ५ वर्षांनी लहान आहे. सोनमला राजसोबत लग्न करायचे होते. पण तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न ट्रान्सपोर्ट बिझनेसमन राजा रघुवंशीसोबत लावून दिलं. राजाशी सोनमने लग्न केलं खरं पण लग्नाला एक महिना पूर्ण होण्याच्या आतच तिने नवऱ्याची हत्या केली.

सोनम आणि राजाच्या कुटुंबीयांची भेट एका अॅपद्वारे झाली होती. सोनम आणि राजाचा साखरपुडा ११ फेब्रुवारीला झाला होता. त्यानंतर सोनमने राजाला मारण्याचा प्लान केला. तिने बॉयफ्रेंड राज कुशवाहसोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचला. लुटण्याच्या बहाण्याने राजाला मारून टाकू. त्यानंतर मी विधवा होईल. मग मी तुझ्याशी लग्न करू शकेल. माझे वडीलही या लग्नाला नकार देणार नाहीत.', असं सोनमने राजला सांगितले होते.

राज आणि सोनमच्या लग्नामुळे दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. सोनम कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत प्रेमाने वागायची त्यामुळे कुणाला तिच्यावर संशय आला नाही. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच सोनमने हनिमूनला जाण्याचा प्लान करत राजला शिलाँगला घेऊन गेली. राज आणि सोनमने राजाला मारण्यासाठी तिघांना सुपारी दिली होती. २० लाखांची सुपारी सुपारी सोनमने दिली होती. राजाची हत्या करण्यापूर्वी सोनमने त्याला दरीत ढकलून दिलं. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर धारधार शस्त्रांनी वार करत त्याची निर्घृण हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT