Indian Railway  Saam Tv
देश विदेश

Reservation Chart : ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी येणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

Railway reservation chart timing revised: रेल्वेने आरक्षण चार्टसाठी नवा नियम लागू केला आहे. १४ जुलैपासून ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी चार्ट प्रसिद्ध होईल. प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय.

Namdeo Kumbhar

Revises Reservation Chart : प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने नियोजित करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या तयारीच्या आणि आरक्षण चार्टच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय वेस्टर्न रेल्वेने घेतला आहे. रेल्वेचे तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांचे नाव, कोच क्रमांक आणि बर्थची माहिती असलेले आरक्षण चार्ट तयार केले जातात. स्थानक किंवा दूरच्या स्थानकातून ट्रेन सुटण्याच्या ४ तास आधी ही यादी प्रसिद्ध केली जाते. पण आता हा चार्ट ८ तास आधी जारी केला जाईल. १४ जुलैपासून याची अंमलबजावणी केली जाईल, असे वेस्टर्न रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, सकाळी 05:01 ते दुपारी 2:00 या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण चार्ट आता आदल्या दिवशीच्या रात्री 9:00 वाजता तयार केला जाईल. दुपारी 2:01 ते 4:00 या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण तक्ता त्या दिवशी सकाळी 7:30 वाजता तयार होईल. सायंकाळी 4:01 ते रात्री 11:59 आणि मध्यरात्री 00:00 ते सकाळी 05:00 या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण तक्ता नियोजित प्रस्थान वेळेच्या आठ तास आधी तयार जाहीर केला जाईल.

रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दुसऱ्या आरक्षण तक्त्याच्या नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही. ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या ३० मिनिटे आधीच अंतिम आरक्षण चार्ट तयार केला जाईल. प्रवासी अंतिम यादी तयार होईपर्यंत रिक्त बर्थसाठी आरक्षण करू शकतील. हा निर्णय प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करता यावे आणि शेवटच्या क्षणी गोंधळ व गर्दी टाळता यावी या उद्देशाने घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

Leg Pain After Garba : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update : Mumbai: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

Amla and aloe vera juice: सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? वाचा

बहीण भावाच्या नात्याला काळिमा! वारंवार अत्याचार केल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

SCROLL FOR NEXT