Railway Cuts Fares of All Train AC chair car Including Vande Bharat Saam TV
देश विदेश

Railway Train Fare : रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! वंदे भारतसह सर्व ट्रेनमधील AC चेअरचे भाडे २५ टक्क्यांनी कमी

रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! वंदे भारतसह सर्व ट्रेनमधील AC चेअरचे भाडे २५ टक्क्यांनी कमी

साम टिव्ही ब्युरो

Railway Cuts Fares of All Train AC chair car Including Vande Bharat : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने सर्व ट्रेन ज्यात एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह कारच्या मूळ प्रवासी भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रवाशांना या निर्णयाचा फायदा तात्काळ प्रभावाने मिळणार आहे. मात्र, ज्यांनी आधीच बुकिंग केली आहे, अशांना कोणत्याही प्रकारचे रिफंड मिळणार नाही. रेल्वे बोर्डाने शनिवारी यासंदर्भात एका आदेशात म्हटले की, एसी चेअर कार असलेल्या ट्रेनमध्ये सवलत दर योजना (Discounted Fare Scheme) सुरू करण्यासाठी विभागीय रेल्वेकडे अधिकार सोपवले आहेत.

ट्रेनमधील आसन क्षमतेचा पूर्णपणे वापर होण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने एसी ट्रेनमध्ये सवलत प्रवासी दर योजना सुरु करण्यासाठी विभागीय रेल्वेला अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या संख्येच्या आधारावर प्रवासी भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येईल. (Latest Marathi News)

या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना लाभ

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, ही योजना एसी चेअर कार आणि सर्व एसी ट्रेनमधील एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी लागू होणार आहे. त्यात अनुभूती आणि विस्टाडोम ट्रेनचाही समावेश आहे. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना भाड्यात एकूण प्रवाशांच्या संख्येच्या आधारे २५ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येईल.

परिपत्रकानुसार, ही सवलत मूळ प्रवासी भाड्यावर कमाल २५ टक्क्यांपर्यंत मिळू शकेल. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट सरचार्ज, जीएसटीसारखे अन्य शुल्क वेगळे आकारले जाऊ शकतात. प्रवाशांच्या संख्येच्या आधारे कोणत्याही क्लास किंवा सर्व क्लासमधून प्रवास करणाऱ्यांना सूट दिली जाऊ शकते. मागील ३० दिवसांच्या कालावधीत ५० टक्क्यांहून कमी प्रवासी संख्या असलेल्या क्लासवरही सवलत दर योजना लागू करण्याचा विचार केला जाऊ शकतो

ही सवलत तात्काळ लागू करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. आधीपासूनच आरक्षण केले असेल अशा प्रवाशांना रिफंड मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सुट्ट्या किंवा सण-उत्सवांच्या काळात चालवल्या जाणाऱ्या विशेष ट्रेनसाठी ही योजना लागू होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT