पंजाब: कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत. सिद्धू मूसेवाला यांचे वडील बलकौर सिंग (Balkaur Singh) आणि आई चरण कौर ( Charan Kaur) यांची भेट घेऊन राहुल गांधी शोक व्यक्त करणार आहेत. तसेच पंजाबमधील (Punjab) आम आदमी पक्षाच्या सरकारला ते सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येवरुन धारेवर धरणार आहेत. मूसेवाला यांची २९ मे ला संध्याकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. राहुल गांधी यांनी यापूर्वीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या हत्येबद्दल दु:ख व्यक्त केले होते. ते म्हणाले होते की, काँग्रेस नेते आणि प्रतिभावान कलाकार सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमुळे धक्का बसला आहे. जगभरातील त्यांचे चाहते आणि चाहत्यांना माझ्या संवेदना असं ट्वीट राहुल गांधींनी केलं होतं. (Rahul Gandhi to visit Sidhu Moosewala's family; Strict police security outside the Moosewala's house in Mansa)
(Rahul Gandhi Latest Marathi News)
हे देखील पाहा -
सिद्धू मूसेवाला पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांच्या जवळचे होते. मूसेवाला यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी मानसा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. मात्र, आम आदमी पक्षाचे डॉ. विजय सिंगला यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. यानंतर आप सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली आणि दुसऱ्याच दिवशी मूसेवाला यांची हत्या करण्यात आली.
पंजाबमध्ये या वर्षी फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणूका झाल्या. आम आदमी पक्षाने ११७ पैकी ९२ जागा जिंकून सरकार स्थापन केले. येथील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दुरावस्थेमुळे आता सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्याच्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर जनता आणि विरोधी पक्ष सवाल करत आहेत. धमकी देऊनही मूसेवाला यांची सुरक्षा का काढून घेण्यात आली, असा सवालही केला जात आहे. (Mansa, Punjab - Security tightened outside the residence of the late singer and Congress leader Sidhu MooseWala.)
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.