Rahul Gandhi on Modi remarks Saam TV marathi
देश विदेश

Rahul Gandhi : आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी, आता तृणमूल... राहुल गांधींच्या पोस्टने राजकीय वर्तुळात भूकंप

Rahul Gandhi : तृणमूल काँग्रेसचे नाव आणि ‘Flowers & Grass’ निवडणूक चिन्ह अंतरिम स्वरूपात गोठवल्यानंतर राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.

Namdeo Kumbhar

Rahul Gandhi Targets Modi Government and Election Commission : ममता बॅनर्जी यांच्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह आयोगाकजून गोठवण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता तृणमूल काँग्रेसवर संकट आले आहे, भाजप आणि निवडणूक आयोग मिळून पक्ष फोडत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

लोकशाहीच्या सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि आयोगावर टीका केली. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, मते चोरीला जाणे, सरकार चोरीला जाणे आणि आता अख्खा पक्षच चोरला जाणे ही आपल्या लोकशाहीच्या अधोगतीची स्पष्ट चिन्हे आहेत. जनतेच्या कौलाचे रक्षण करणे ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी असताना, आयोग मात्र याउलट जनादेश बदलणाऱ्या ताकदींनाच मदत करत आहे. ही लढाई केवळ ममता बॅनर्जी किंवा एका पक्षापुरती मर्यादित नसून, देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका इच्छिणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाची आणि मतदाराची आहे, असेही त्यांनी ठामपणे मांडले.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये नेमंक काय म्हटले?

आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी (NCP) आणि आता तृणमूल काँग्रेस (TMC). प्रत्येकवेळी तोच तोच पॅटर्न – भाजप आणि निवडणूक आयोग मिळून एक पक्ष फोडतात आणि नंतर त्या पक्षाचे अधिकृत चिन्हच हिरावून घेतात. जेव्हा संपूर्ण पक्षच्या पक्षच चोरला जाऊ शकतो, तेव्हा करोडो भारतीयांची मते चोरली जाणे यात काहीच नवल नाही. मते चोरीला जाणे, सरकार चोरीला जाणे आणि आता अख्खा पक्षच चोरला जाणे – ही आपल्या लोकशाहीच्या अधोगतीची चिन्हे बनली आहेत.

जनतेच्या कौलाचे रक्षण करणे ही निवडणूक आयोगाची (ECI) घटनात्मक जबाबदारी आहे. मात्र, याउलट ते जनता जनार्दनाचा कौलच बदलून टाकणाऱ्या शक्तींना मदत करत आहेत.ही लढाई केवळ ममता बॅनर्जी यांची एकट्याची नाही. ही लढाई अशा प्रत्येक राजकीय पक्षाची आणि देशातील प्रत्येक मतदाराची आहे, ज्यांना देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patekar: नाना पाटेकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा कहर! मुंबईसह ६ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून २ दिवसासाठी अलर्ट

क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीत आले अन् अनर्थ घडला! कल्याणच्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

Urinary Problem: थांबून-थांबून लघवी होत असेल तर दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

आईने भावाच्या नावावर शेती केली; मुलाची सटकली, घरात असं काही थरारक घडलं की अख्खं गाव हादरलं

SCROLL FOR NEXT