Rahul Gandhi Security Breached Video SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi Security Breached | राहुल गांधींच्या सुरक्षेत ३५ मिनिटांत दोनदा चूक, तरुणानं यात्रेत घुसून मिठी मारली

Rahul Gandhi Security Breached Video : राहुल गांधी यांच्या सुरक्षेत दोनदा मोठी चूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. पंजाबमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान हा प्रकार घडला.

Nandkumar Joshi

Rahul Gandhi Security Breached In Bharat Jodo Yatra : पंजाबमध्ये भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेत अवघ्या ३५ मिनिटांच्या अंतराने दोनदा चूक झाल्याचे दिसून आले.

होशियारपूरमध्ये एका तरूणाने राहुल गांधींकडे धाव घेतली आणि त्यांना मिठी मारली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच दुसरा एक संशयित तरूण राहुल गांधींच्या दिशेने जात होता, असे समोर आले आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झाले असून, सध्या ही यात्रा पंजाबमध्ये आहे. या दरम्यान, राहुल गांधी यांच्या सुरक्षेत दोनदा चूक झाली. राहुल गांधी यांना एका तरुणाने मिठी मारली. त्यावेळी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष राजा वडिंग यांच्या मदतीने त्या तरुणाला दूर करण्यात आले.

तर काही वेळानं बस्सी गावाजवळ चहापानासाठी जाताना एक तरूण राहुल गांधींच्या दिशेने जात होता. संशयित तरूण राहुल गांधींच्या जवळ येत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी बघितले आणि त्या तरूणाला पकडले. या दोन्ही घटना अवघ्या ३५ मिनिटांच्या अंतराने घडल्या आहेत.

राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले असून, याआधीच्या पाच दिवसांत येथे अशा प्रकारे सुरक्षेत कोणतीही चूक झाली नाही. त्यावर राहुल गांधी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकाराची चौकशी झाली आहे. सुरक्षेत कोणतीही चूक झालेली नाही. तो तरूण भेटण्यासाठी आला होता. तो मला भेटण्यास खूप उत्सुक होता. उत्साहाच्या भरात त्याला गळाभेट घ्यायची होती, असं राहुल यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

SCROLL FOR NEXT