Rahul Gandhi Slams PM Modi And BJP
Rahul Gandhi Slams PM Modi And BJP Saam TV
देश विदेश

Rahul Gandhi Press Conference: 'मी घाबरणार नाही, लढत राहणार...' खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींचा हल्लाबोल; अदानींना वाचवण्यासाठीच...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rahul Gandhi Press Conference : मोदी आडनावाबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी दाखल खटल्यात गुजरातमधील कोर्टानं दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी आपोआप रद्द करण्यात आली. यासंबंधी लोकसभा सचिवालयानं नोटिफिकेशन प्रसिद्ध केले. त्यानंतर काँग्रेसने भाजप आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

यासंबंधी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका केली. गौतम अदानी आणि नरेंद्र मोदींचे काय संबंध आहेत, असा सवाल केल्यानंच माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राहुल यांनी यावेळी केला.

काय म्हणाले राहुल गांधी...

या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरुन भाजपवर सडकून टीका केली. "लोकशाहीवर हल्ला होत आहे, ज्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. मी फक्त प्रश्न विचारला होता, मोदींचे (Narendra Modi)अदांनीसोबत मोदींचे काय संबंध आहेत, आणि ते २०, ००० कोटी कोणाचे आहेत. अदांनीचा पैसा नाही. पैसा अन्य लोकांचा आहे, ते पैसे कुणाचे आहेत. असा प्रश्न मी केला, यावरुनच माझा आवाज दाबण्यात आल्याचे ते म्हणाले.

तसेच याबद्दल पुढे बोलताना राहुल गांधी यांनी "माझी लढाई ही भारतीय लोकशाहीसाठी असून माझा आवाज दाबल्याने मी घाबरणार नाही, मी लढतचं राहणार," असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे.

"संसदेत माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. पण मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. मला कोणाही घाबरवू शकत नाही. माझ्यावर झालेल्या कारवाईने मी घाबरणार नाही. मी संसदेत प्रश्न विचारले, माझ्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. माझी खासदारकी गेल्याने मला काही फरक पडत नाही, या देशानं मला सर्वकाही दिलं आहे. देशानं मला प्रेम, सन्मान हे सर्व दिल्याचे म्हणत मी लढत राहणार असल्याचेही ,"राहुल गांधी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नाशिकमध्ये बारदानाच्या गोदामाला भीषण आग

Ghaziabad Fire Update: कुलिंग टॉवर बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी

Nashik Robbery : ICICI होम फायनान्सच्या लॉकरवरच डल्ला; ५ कोटींचे दागिने लंपास, CCTV

Ramandeep Singh Catch: लखनऊमध्ये अवतरला 'सुपरमॅन' ; रमनदीपने २१ मीटर मागच्या दिशेने धावत टिपला IPL चा बेस्ट कॅच - Video

Manoj Jarange Patil on Jay Pawar Meeting | जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? दिले स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT