Balasaheb Thorat News: 'आमच्याकडेही जोडे आहेत लक्षात ठेवा...' बाळासाहेब थोरातांचा सत्ताधाऱ्यांना इशारा; संबंधितांना निलंबित करण्याची मागणी

Maharashtra Congress: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्यात आले होते, यावर बाळासाहेब थोरात यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
balasaheb thorat
balasaheb thoratSaam TV

>>निवृत्ती बाबर

Maharashtra Assembly Budget Session: राहुल गांधी (Rahul Gandhi) प्रकरणावरुन सध्या देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणातही पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या आवारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्यात आले होते. ज्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत जोरदार विरोध दर्शवला होता. या घटनेवर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

balasaheb thorat
Pune News: राहुल गांधी प्रकरणावर विरोधक आक्रमक! बच्चू कडूंची आमदारकी कधी रद्द होणार? पुण्यात झळकले बॅनर

काय म्हणाले बाळासाहेब थोरात..

राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनावर विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी कडाडून निषेध व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही या घटनेचा निषेध केला. तर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी याबद्दल बोलताना जे घडलं ते अत्यंत चुकीचं आहे, राहुल गांधी हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, सत्ताधाऱ्यांनी आमच्याकडे सुद्धा पायथान आहेत हे लक्षात ठेवा, असा कडकडीत इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच याबद्दल पुढे बोलताना, "आपल्या सभागृहात आणि प्रांगणात चुकीचं घडतंय असं होत असेल तर त्याला अध्यक्ष जबाबदार असतात असे म्हणत अशाप्रकारची घटना भविष्यातही एखाद्या नेत्यासोबत घडेल, हे प्रकार टाळण्यासाठी ठोस निर्णय घेणे गरजेचे होते, मात्र अध्यक्ष टाळाटाळ करत असल्याचा," आरोपही त्यांनी यावेळी केला.

balasaheb thorat
Ujjwala Yojana LPG Subsidy: मोदी सरकारची सामान्यांना मोठी भेट! एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा; कोट्यवधी कुटुंबांना दिलासा

दरम्यान, सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा दिल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत निषेध नोंदवला आहे. ही कारवाई म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याची प्रतिक्रिया अनेक राजकीय नेत्यांनी दिली आहे. तसेच या कारवाईविरोधात कॉंग्रेसने आंदोलनेही सुरू केली आहेत.. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com