Rahul Gandhi In Bharat Jodo Yatra
Rahul Gandhi In Bharat Jodo Yatra Twitter/@INCIndia
देश विदेश

Bharat Jodo Yatra: भारताचे तुकडे होऊ देणार नाही; भारत जोडो यात्रेत राहुल गांधी लहानग्यांसोबत मनसोक्त धावले, पाहा Video

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Bharat Jodo Yatra In Telangana: काँग्रेसची भारत जोडो यात्रा रविवारी पुन्हा सुरू झाली. तेलंगणामधील पाचव्या दिवशी गोलपल्ली येथून यात्रेला सुरुवात झाली. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) हे कॉंग्रेस कार्यकर्ते आणि लहान मुलांसोबत धावले, त्यामुळे यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर याचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये राहुल गांधी धावताना दिसत आहेत.

याशिवाय काँग्रेसने (Congress) आजच्या दौऱ्याची काही छायाचित्रेही पोस्ट केली आहेत. "अन्याय आणि द्वेषाच्या विरोधात आवाज उठवायचा आहे, आम्ही भारताला असे तुकडे होऊ देणार नाही" असे कॉंग्रेसच्या ट्विटर हॅंडलवर लिहिण्यात आले आहे. (Rahul Gandhi Latest News)

पाहा व्हिडिओ -

राहुल गांधी आज २२ किमीचे अंतर कापणार

काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी आज, रविवारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह सुमारे 22 किमीचे अंतर कापणार आहेत. राहुल गांधी सायंकाळी शादनगर येथील सोलीपूर जंक्शन येथे सभेला संबोधित करतील.

7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ही यात्रा तेलंगणा राज्यातील एकूण 375 किमी अंतर कापणार आहे. यादरम्यान ही यात्रा तेलंगणातील 19 विधानसभा आणि सात लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेला एक दिवसाची विश्रांती देण्यात येणार आहे.

Edited By - Akshay Baisane 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Sushma Andhare : 'लाव रे तो व्हिडिओवर' सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया; बाळासाहेबांचं नाव घेत राज ठाकरेंना सुनावलं

Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्राच्या राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

RCB vs DC: बेंगळुरूचा 'चॅम्पियन' गेम; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली भरारी

SCROLL FOR NEXT