Rahul Gandhi Press Conference Live Gyanesh Kumar x
देश विदेश

Rahul Gandhi : मतचोरांना आयोगाच्या आयुक्तांकडून पाठिंबा, राहुल गांधींचा गंभीर आरोप; CID चे पुरावे दाखवत 'बॉम्ब' फोडला

Rahul Gandhi Press Conference Live Gyanesh Kumar : मतचोरीच्या प्रकरणावर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार हे मतचोरांना पाठिशी घालत असल्याचे म्हटले आहे.

Yash Shirke

  • राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मतचोरीला पाठिंबा देत असल्याचा आरोप केला.

  • त्यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करीत पुरावे सादर केले.

  • कर्नाटक सीआयडीच्या १८ पत्रांकडे आयोगाने दुर्लक्ष केल्याचे राहुल गांधी यांनी वक्तव्य केले.

Rahul Gandhi Press Conference Live Election Commission Gyanesh Kumar : मतचोरीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा मतचोरीचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मतचोरी होत असल्याचे अनेक पुरावे दाखवत निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपवर टीका केली. त्यांनी निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही आरोप केले.

निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार हे मतचोरी करणाऱ्यांना मदत करत आहेत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी पुरावे सादर केले. ते म्हणाले, 'कर्नाटक सीआयडीकडून आयोगाला १८ पत्रे पाठवण्यात आली. त्याबाबत कुमार यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये पहिले पत्र पाठवण्यात आले. पण त्यात दिलेल्या माहितीची गरज नव्हती. कर्नाटक सीआयडीने १८ वेळा पत्र पाठवूनही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही उत्तर मिळाले नाही. आयुक्त मतचोरांना मदत करत असल्याचे पुरावे आहेत. आयोगाच्या आतमधून मदत मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या आतमधून आम्हाला माहिती मिळत आहे, आम्हाला मदत केली जात आहे. हे थांबणार नाही. देशातील लोक मतचोरीला थारा देणार नाही.'

'वेगवेगळ्या राज्यातील क्रमांकाचा वापर करुन मत डिलीट केली जात आहेत. या क्रमांकावर फोन केल्यानंतर कोणीही प्रतिसाद करत नाही. या क्रमांकाचा वापर जेव्हा केला गेला, तेव्हा ते कुठे होते? त्याचा आयपी अ‍ॅड्रेस काय होता? या क्रमांकांवरुन काही सेकंदात मत डिलीट केले होते. प्रोसेस पाहायला गेले तर हे असे होणे शक्यच वाटत नाही. पहाटे ४ वाजता प्रोसेस होते. नागराज यांच्या क्रमांकावर ३६ सेकंदात नाव डिलीट केले गेले. त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. सर्वकाही ठरवून केले जात आहे', असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले.

राहुल गांधी म्हणाले, 'व्होटर लिस्टमधील पहिल्या क्रमांकावरील व्यक्तीकडून हे डिलीट करण्याचे काम केले जात आहे. हे सर्व एकाच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केले जात आहे. कर्नाटकमधील ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला जास्त मत होती, तेथे टार्गेट करण्यात आले. ज्या ठिकाणी काँग्रेसने ८ जागा जिंकल्या, तेथे मतांची चोरी झाली. निवडणूक आयोगाचे आयुक्त मतचोरांना पाठीशा घालत आहेत. याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

Maharashtra Live News Update: एमएससीबीच्या वायरमेनच काम करणे शेतकऱ्याच्या जीवावर बेतले

म्हाडाकडून बंपर लॉटरी; पिंपरी चिंचवडमध्ये प्राईम लोकेशनवर फक्त ₹२० लाखांत घर, आजच अर्ज करा

Homemade Hair Mask : ब्युटी पार्लरमध्ये जायला वेळ नाही? घरीच बनवा 'हा' हेअर मास्क, केस होतील चमकदार

SCROLL FOR NEXT