Rahul Gandhi alleges Delhi Police brutality against NSUI workers, : दिल्लीत सुरू असलेल्या एसआयआर (SIR) प्रक्रिया आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्ली पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत.
बुधवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी एनएसयूआई (NSUI) कार्यकर्त्यांच्या हवाल्याने सांगितले की, आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांना अत्यंत निर्घृणपणे मारहाण केली आहे.
एवढेच नव्हे तर पोलिसांच्या या अमानुष मारहाणीमुळे एका महिला कार्यकर्त्याची ऐकण्याची शक्तीच गेल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या मारहाणीचा आणि छळाचा पाढा वाचत धक्कादायक खुलासे केले.
पोटात लाथ मारली, गुप्तांगाला स्पर्श केला
आंदोलक रितू बरारा हिने पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, पोलिसांनी तिच्या पोटात लाथ मारली, बसमधून खाली ओढून फरफटत नेले आणि तिच्या प्रायव्हेट पार्टलाही स्पर्श केला. पोलिसांपैकी एका महिला कॉन्स्टेबल 'चंचल' हिने गळा दाबून मारहाण केल्याचे तिने सांगितले. तसेच, तुझ्यामुळे आमची झोप उडाली आहे, असे म्हणत पोलिसांनी मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा दावा रितूने केला.
कानाचे पडदे डॅमेज, ऐकू येणे बंद झाले
पत्रकार परिषदेत इतर विद्यार्थ्यांनीही पोलिसांच्या क्रूरतेची कहाणी सांगितली. एका विद्यार्थिनीने आरोप केला की, पोलिसांनी तिला इतके बेदम मारले की तिच्या एका कानाने ऐकू येणे बंद झाले आहे. काहींनी पोलिसांवर डोक्यात काठीने मारणे, चेहरा ओरबाडणे आणि विनाकारण फोन हिसकावून घेतल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर अल्पवयीन विद्यार्थ्यांवरही एफआयआर दाखल करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना सांगितले.
पुरावे ठेवा, वेळ आल्यावर कुणालाच सोडणार नाही - राहुल गांधी
विद्यार्थ्यांवरील पोलिसांनी केलेल्या या कथित अत्याचारानंतर राहुल गांधींनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कृत्याचे व्हिडिओ आणि इतर पुरावे सुरक्षित ठेवण्यास सांगितले. "तुम्ही सर्व पुरावे जपून ठेवा, वेळ आल्यावर या सगळ्यांना शिक्षा दिली जाईल," असा इशारा राहुल गांधींनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. याप्रकरणी अद्याप दिल्ली पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.