Rahul Gandhi On Smriti Irani Saam Digital
देश विदेश

Rahul Gandhi On Smriti Irani : स्मृती इराणींबाबत राहुल गांधींचं मोठं विधान; सर्व नेत्यांना केली ही विनंती

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य करू नयेत, असं आवाहन सर्व नेत्यांना केलं आहे. जय पराजय हा जीवनाचा भाग आहे, तो सुरूच राहिल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Sandeep Gawade

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांच्या बाबत मोठं विधान केलं आहे. जय पराजय हा जीवनाचा भाग आहे, तो सुरूच राहिल. त्यामुळे भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरू नका, असं आवाहन त्यांनी सर्व नेत्यांना केलं आहे. स्मृती इराणी किंवा इतर कोणत्याही नेत्याबाबत अपमानास्पद भाषा वापरणे आणि वाईट वागणं टाळावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

स्मृती इराणी यांच्यासह चार माजी केंद्रीय मंत्र्यांनी ल्युटियन्स दिल्लीतील त्यांचा सरकारी बंगला रिकामा केला असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे सरकारमध्ये सामील होणाऱ्या नव्या मंत्र्यांना बंगले वाटप करण्याबाबतही गुरुवारी बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांना कृष्ण मेनन मार्गावरील 3 येथे बंगला दिला जाण्याची शक्यता आहे. हा बंगला पूर्वी माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना देण्यात आला होता.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव करून मोठा विजय मिळवला होता. यानंतर त्यांना सरकारमध्ये महिला व बालविकास मंत्रिपद देण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT