Rahul Gandhi Defamation Case: Saam tv
देश विदेश

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी पुढील निवडणूक लढवू शकतील का?

राहुल गांधी यांना आपली खासदारकी टिकवायची असेल, तर त्यांच्याकडे काही पर्याय आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Rahul Gandhi News: हो... राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. त्यातला एक प्रश्न आहे, राहुल गांधी पुन्हा संसदेत परतू शकतील का..? तर उत्तर आहे... हो... राहुल गांधी यांना आपली खासदारकी टिकवायची असेल, तर त्यांच्याकडे काही पर्याय आहेत.

एक तर त्यांना लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. या कारवाईबाबत ते हायकोर्टात आव्हान देऊ शकतात. कोर्टाने जर या कारवाईवर स्थगिती आणली, तर राहुल गांधी यांची खासदारकी वाचू शकते आणि ते पुन्हा लोकसभेत परतू शकतात. (Latest Marathi News)

राहुल गांधींना शासकीय निवासस्थान सोडावं लागणार?

होय.. राहुल गांधी (Rahul Gandhi) हे लुटियंन्स झोन च्या 12 तुगलक रोड येथील सरकारी निवासात राहतात. पण खासदारकी गेल्यामुळे राहुल गांधी यांना सरकारी घरही सोडावं लागणार आहे. सरकारR घर 22 एप्रिलपर्यंत खाली करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत.

राहुल गांधी 2024 ची निवडणूक लढवू शकतील?

आताच्या कोर्टाने दिलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेचा विचार केला, तर नाही! लोक प्रतिनिधी कायद्यानुसार, ज्या सदस्याविरोधात शिक्षा सुनावली जाते, त्याचं प्राथमिक सदस्यत्व तर रद्द होतच.. पण त्यानंतर सहा वर्षांसाठी त्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यास परवानगी नसते.

आता जर राहुल गांधी यांच्या शिक्षेवरील स्थगिती कायम राहिली तर मात्र राहुल गांधी यांना निवडणूक लढवता येणार नाही. पण जर त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर स्थगिती आली तर मात्र ते निवडणूक लढू शकतात. पण त्यासाठी त्यांना हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळणं नितांत गरजेचं आहे.

वायनाडच्या सीटचं काय होणार?

सभागृहातील एखाद्या सदस्यत्वाचं निधन झालं, किंवा एखाद्या प्रतिनिधिचं सदस्यत्व रद्द झालं, तर त्या ठिकाणी जी घेतली जाते, त्याला पोटनिवडणूक म्हणतात. आता राहुल गांधी हे केरळच्या वायनाडचे खासदार होते. त्यांची खासदारकी रद्द झालीये.. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी 1951 च्या कायद्यानुसार, वायनाडच्या जागेवर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणं, गरजेचं आहे.

राहुल गांधी यांना जर कोर्टाकडून कोणताच दिलासा मिळाला नाही, तर वायनाडच्या जागेवर पोटनिवडणुका होणार, हे तर स्पष्टच आहे. त्याअनुशंगाने निवडणूक आयोगाने विचार करण्यासही सुरुवात केल्याचं बोललं जातंय.

राहुल गांधी यांचं पॉलिटिकल करिअरच धोक्यात?

राहुल गांधी हे गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या भारत जोडो यात्रेमुळे चर्चेत होते. सोशल मीडियात त्यांच्याभोवती एक वेगळ्याप्रकारची सकारात्मक उर्जा पसरलेली होती.. पण आता झालेल्या खासदारी रद्दच्या कारवाईमुळे राहुल गांधी यांच्यासमोरची आव्हानं वाढली आहेत.

राहुल गांधी यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आणि खासदारकी पुन्हा मिळवण्यात त्यांचा यश आलं, तर ती एक लक्षणीय बाब ठरेल. पण जर तसं झालं नाही आणि ते निवडणूक लढवण्यासाठी 8 वर्षांसाठी अपात्र झाले, तर मात्र राहुल गांधी सक्रिय राजकारणात नेमकी काय भूमिका घेणार, हा प्रश्न उरतोच!

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकतात?

हो.. लोकसभेची खासदारकी जरी गेली, तरीही राहुल गांधी हे काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष निश्चित बनू शकतात. सोनिया गांधी यांची खासदारकी गेल्यानंतरही त्या काँग्रेस अध्यक्ष राहिल्या होत्या. काँग्रेस वर्किंग कमिटीद्वारे देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडते. त्याला लोकसभेच्या खासदारकीशी संबंध नसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

SCROLL FOR NEXT