नवी दिल्ली : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. लोकसभेचे गटनेते पद बदलण्याच्या हालचाली पक्षात सुरु झाल्याचे बोलले जात आहे. या पदावर राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा आहे.
सध्या रंजन चौधरी हे लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आहेत. त्यांना या पदावरुन हटविण्याच्या हालचाली आहेत. पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्त्वात लढली गेली. या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना या पदावरुन हटवावे, अशी मागणी होत आहे. त्यांच्या जागी राहुल गांधी यांच्याकडे गटनेते पद सोपवावे अशी काँग्रेसच्या काही खासदारांची मागणी आहे.
मात्र, काँग्रेसकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद नाही. त्यामुळे गटनेता पद राहुल गांधी स्वीकारणार का, हा प्रश्न आहे. काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी आणि शशी थरुर यांच्याही नावाची चर्चा आहे. याबाबतचा अंतीम निर्णय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी घेणार आहेत.
Edited By - Amit Golwalkar