Anurag Thakur On Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. यावरूनच आता भाजप नेतेही संतापल्याचं दिसत आहे. राहुल गांधी यांनी परदेशात देशाचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
राहुल गांधी यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हटलं आहे की, "राहुल गांधी त्यांच्या परदेश दौऱ्यांमध्ये नेहमीच भारताचा अपमान करतात. पंतप्रधान मोदी यांनी जगभरातील २४ पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना भेटले आणि त्यांच्या परदेश दौऱ्यांमध्ये ५० हून अधिक बैठका घेतल्या. अलीकडेच ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले की 'पीएम मोदी बॉस' आहेत.''
ते म्हणाले, "आज जगाला भारताच्या नेतृत्वात आशा दिसत आहे. ७५ वर्षांत असे कधीच घडले नाही. सत्य हे आहे की आपल्या नेत्यामुळे १४० कोटी देशवासीयांचा आदर वाढत आहे. हे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला पचनी पडणार नाही.'' (Latest Marathi News)
अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, ''याआधीही ते (राहुल गांधी) भारताला राष्ट्र मानत नव्हते. ते देशाला राज्यांचे महासंघ म्हणतात आणि भारताच्या प्रगतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. परदेशात जाऊन राहुल गांधींना काय साध्य करायचे आहे? प्रायोजित कार्यक्रम? देशावर चिखलफेक करणे हे त्यांचे काम आहे का? जगामध्ये भारताचा दर्जा सातत्याने वाढत असताना राहुल गांधी देशावर प्रश्न उपस्थित करत आहेत.'' (Rahul Gandhi insults India during his foreign visits Said Anurag Thakur)
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले आहेत की, ''काही लोकांना असं वाटतंय की त्यांना देवापेक्षा जास्त कळतं. लोकांना वाटते की पंतप्रधान मोदींना सर्व काही माहित आहे.'' ते म्हणाले की, ''ते इतिहासकारांना इतिहास, शास्त्रज्ञांना विज्ञान आणि सैन्याला युद्धशास्त्र समजावून सांगू शकतात. जर मोदींनी देवाजवळ बसवलं तर ते देवालाही समजावू शकतील.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.