RAHUL GANDHI ON WOMEN SAFETY: 
देश विदेश

हिंसा, अनादर, नियंत्रण बंधनं...; राहुल गांधींनी मांडली महिलांच्या परिस्थितीचं भयानक वास्तव दाखवणारी आकडेवारी

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यातील कार्यक्रमात राहुल गांधी यांनी महिलांवरील हिंसा, अनादर आणि नियंत्रणाच्या मुद्द्यांवर भाष्य करत महिलांच्या परिस्थितीबाबत आकडेवारी मांडली.

Bharat Jadhav

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रम पार पडला. या सभेसाठी राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी हजारो विद्यार्थिनी उपस्थित होत्या. काही विद्यार्थिनींनी मंचावर जात स्वत:च्या अडचणी सांगितल्या. दरम्यान यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी देशातील महिला, तरुणींची काय स्थिती आहे, याबाबत माहिती दिली. यावेळी महिलांवरील अत्याचाराच आकडेच मांडले. देशातील महिलांची स्थिती गंभीर असल्याचे त्यांनी या आकडेवारीतून सांगितले.

राहुल गांधी यांनी आपल्या सभेचे स्वरुप संवादात्मक ठेवले होते. या सभेमध्ये अनेक मुलींनी मंचावर जाऊन अडचणी मांडल्या. काही मुलींनी घरातून होत असलेली अडवणूक, रस्त्यावर फिरताना काढली जाणारी छेड, शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष यावर याबाबत सांगितले. दुसरीकडे राहुल गांधी यांनीदेखील तरुणींना, मुलींना पुढे जाण्यासाठी संधी मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. सध्या देशात महिलांची स्थिती खूप गंभीर असल्याचे सांगताना काही आकडेवारी सांगितली.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात तसेच तरुणींसोबतच्या संवादात एक पीपीटीही सादर केली. या पीपीटीत त्यांनी भारतातील महिला हिंसाचाराचे आकडे मांडले. देशात अनेक ठिकाणी महिलांवर लैंगिक अत्याचार होतात. परंतु बऱ्याच प्रकरणांची नोदं होत नाही. देशात मुली जन्माआधीच प्रत्येक वर्षी साडेचार लाख मुलगी अर्भकांची हत्या केली जाते. या सभेला आलेल्या साधारण 80 टक्के मुलींचा विनयभंग करण्यात आलेला आहे. हा विनयभंग शाळा, कॉलेज, बसमध्ये, रस्त्यावर, रेस्टॉरंटमध्ये होत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केलाय. साधारण 29 टक्के महिलांवर शारीरिक हिंसाचार होतो. घरी, रस्त्यावर महिलांना मारले जाते. सोबतच 100 पैकी 6 महिलांवर भारतात बलात्कार होतो, अशी धक्कादायक आकडेवारी राहुल गांधी यांनी मांडली.

७० कोटी महिला युनिक

तुमच्यापैकी प्रत्येक जण या विश्वात युनिक आहे. जर मी तुमच्यापैकी कोणालाही शोधू लागलो, तर मला त्या व्यक्तीची हुबेहूब कॉपी कधीच सापडणार नाही. तुम्ही युनिक आहात, तुम्ही खास आहात, तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात आणि तुमचे स्वतःचे स्वप्न आहे, तुमच्या आयुष्यासाठी तुमची स्वतःची दृष्टी आहे. बरोबर आहे की चूक? अनेकदा लोक मला विचारतात की भारताची सर्वात मोठी ताकद कोणती आहे आणि जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला अनेक उत्तरे मिळतात. कोणी म्हणेल आपली अर्थव्यवस्था, कोणी म्हणेल आपले सैन्य, कोणी म्हणेल आपली वैद्यकीय व्यवस्था. पण भारताची सर्वात मोठी ताकद, आपली सर्वात मोठी संपत्ती कोणती आहे याबद्दल माझ्या मनात अगदी स्पष्टता आहे आणि ती ताकद म्हणजे भारतातील महिला. जगात असलेल्या ७० कोटी महिला युनिक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : काँग्रेसकडून आदिती पोहरे अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात

Suranachi Bhaji : सुरणाच्या पानांपासून बनवा 'हा' पदार्थ, डायबिटीज ठेवेल कंट्रोलमध्ये

Saturday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 6 राशींचे भाग्य उजळेल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT