BJP minister Dinesh Pratap Singh blocks Rahul Gandhi’s convoy in Rae Bareli, shouting “Go Back” slogans on highway. saam tv
देश विदेश

Rahul Gandhi : राहुल गांधी गो बॅक! भाजप सरकारच्या मंत्र्यांनी अडवला ताफा, घेराव घातला, रस्त्यावरच मांडला ठिय्या

Rahul Gandhi’s Convoy Blocked in Rae Bareli : राहुल गांधी रायबरेली मतदारसंघात बुधवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे राहुल यांना विरोध होऊ लागला. उत्तर प्रदेशातील भाजप सरकारच्या मंत्र्यांनी समर्थकांसह त्यांचा ताफा अडवला. तसेच रस्त्यावरच ठिय्या मांडला. राहुल गांधी परत जा, परत जा!, अशा घोषणाही दिल्या.

Nandkumar Joshi

  • राहुल गांधी रायबरेली दौऱ्यावर, भाजप नेत्यांचा विरोध

  • मंत्री दिनेश प्रताप सिंह यांनी महामार्गावर ठिय्या मांडला

  • राहुल गांधी यांचा ताफा अडवला

  • राहुल गांधी गो बॅकच्या जोरदार घोषणा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना त्यांच्या रायबरेली मतदारसंघातच विरोधी पक्ष भाजपच्या रोषाला सामोरे जावे लागले. गांधी हे रायबरेली मतदारसंघाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी तिथे पोहोचताच उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भाजपचे नेते आणि मंत्री दिनेश प्रताप सिंह यांनी विरोध केला.

लखनऊ-प्रयागराज महामार्गावर सिंह यांनी ठिय्या मांडून राहुल गांधी यांचा ताफा अडवला. रस्त्याच्या मधोमध सिंह आपल्या समर्थकांसह बसून राहिले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जवळपास २० मिनिटे त्यांनी राहुल यांचा ताफा अडवून ठेवला. राहुल गांधी परत जा अशी घोषणाबाजी केली.

खासदार राहुल गांधी हे बुधवारी रायबरेलीला पोहोचले. लखनऊहून रायबरेलीला येताना हरचंदपूर परिसरात गुलुपूरजवळ त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. दिनेश प्रताप सिंह आणि त्यांचे समर्थक हायवेवर ठाण मांडून बसले. यावेळी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. मंत्री प्रताप सिंह यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते शांत झाले. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी सिंह यांनी केली. बिहारमध्ये त्यांच्या उपस्थितीतच पंतप्रधानांच्या आईला शिवीगाळ केली असा आरोप करतानाच, हे योग्य नाही, असे ते म्हणाले.

राज्य सरकारमधील मंत्र्यांनीच राहुल गांधी यांचा ताफा अडवल्यानं पोलीस विभागाची तारांबळ उडाली. बराच वेळ हायवेवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. बऱ्याच वेळाने राहुल गांधी यांचा ताफा पुढे सरकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT