Modi Surname Case : काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांना पाटणा उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पाटणाच्या एमपी-एमएलए न्यायालयाने मोदी आडनाव प्रकरणात त्यांना मंगळवारी (25 एप्रिल रोजी) प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते.
यातून सूट मिळावी म्हणून राहुल गांधी यांनी पाटणा उच्च न्यायालयात अर्ज केला होता. यातच आता एमपी-एमएलए न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत पाटणा उच्च न्यायालयाने 15 मे ही तारीख दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना १२ एप्रिलला एमपी-एमएलए न्यायालयात हजार राहण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र ते आले नाही. त्यांना न्यायालयात हजार राहण्यापासून सूट मिळावी अशी मागणी त्यांच्या वकिलाने केली होती. (Latest Marathi News)
तर दुसरीकडे भाजप नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या वकिलांनी त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. राहुल गांधी यांचा जामीन रद्द करून ते न्यायालयात हजर राहतील याची खात्री करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश द्यावेत, असे न्यायालयाला सुशील मोदी यांचे वकील म्हणाले होते.
यानंतर न्यायालयाने २५ एप्रिल रोजी राहुल गांधी यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर राहुल गांधी यांनी पाटणा उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती संदीप कुमार यांच्या न्यायालयाने एमएपी-एमएल न्यायालयात हजर राहण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.