Rahul Gandhi, PM Narendra Modi in Rajasthan Assembly Elections 2023 SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi In Rajasthan : शेतकऱ्यांना पहिल्यांदाच टॅक्स भरावा लागत आहे; राहुल गांधींचे PM मोदींवर टीकास्त्र

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Rajasthan Elections 2023 :

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला. राजस्थानच्या चुरू येथे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी मोदींवर गंभीर आरोप केले. आम्ही येथे गरिबांचं सरकार चालवतो. आम्ही तुमचं रक्षण करतो. पण नरेंद्र मोदी यांनी जीएसटी लागू केला आणि पहिल्यांदाच देशातील शेतकऱ्यांना टॅक्स भरावा लागतोय. त्यांनी नोटबंदी केली आणि सर्व लहान व्यापाऱ्यांना संपवलं, असंही गांधी म्हणाले.

(Latest Marathi News)

कोरोना काळात देशभरात लोक मरत होते आणि तेव्हा मोदींनी थाळ्या वाजवायला सांगितल्या अशा शब्दांत टीका करतानाच, मोदी उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप राहुल यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राहुल गांधी म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींची दिलेल्या हमीवर लोक हसत आहेत. त्यांनी १५ लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते लोकांना मिळाले का? काँग्रेसचं सरकार म्हणजे शेतकरी आणि मजुरांचं सरकार!'

तुम्हाला अदानींचं सरकार हवं की शेतकरी, मजूर आणि तरुणांचं सरकार हवं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित मतदारांना विचारला. राजस्थानच्या सरकारनं जनतेसाठी खूप काम केलं आहे, असा दावाही गांधींनी केला. भाजपचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही जे लोकांसाठी केलं आहे ते बंद होईल आणि अब्जाधीशांसाठी ते सरकार काम करेल, असंही ते म्हणाले.

जिथे बघाल तिथे अदानी उद्योग उभारत आहेत. विमानतळे, बंदरे, सीमेंट प्रकल्प, रस्ते सर्व काही तेच करत आहेत. ते श्रीमंतांसाठी काम करत आहेत. ते अदानींची मदत करतात. अदानी पैसे कमावतात आणि तो परदेशांमध्ये वापरला जातो, असा गंभीर आरोपही राहुल यांनी केला.

मोदींनी कृषी कायदे आणले. त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल असं त्यांनी सांगितले. पण संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी याविरोधात धरणे धरले. हे कायदे आमच्यासाठी नसून, उद्योगपतींसाठी असल्याचे शेतकरी म्हणाले. काँग्रेस आणि शेतकऱ्यांनी एकवटून हे कायदे मागे घ्यायला लावले, असा दावाही राहुल यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT