Rahul Gandhi  Saam tv
देश विदेश

Rahul Gandhi News: PM मोदींच्या मंत्रिमंडळात नाराजी, सरकार कोसळू शकतं; राहुल गांधी यांचा मोठा दावा

Rahul Gandhi on Modi Government : मोदी सरकारवर राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे. मोदी सरकारकधीही कोसळू शकतं, असा दावा राहल गांधी यांनी केला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते, खासदार राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आकड्यांमधून देशातील राजकारणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. भाजपला बहुमत न मिळाल्याने मोदी सरकारला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणे मोठे आव्हान असणार आहे. तसेच मोदी सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारबाबत मोठा दावा केला आहे. या मुलाखतीत म्हटलं की, 'भारतीय राजकारणात मोठे बदल झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्या एका चुकीमुळं सरकार पडू शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नाराजी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमधील खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राष्ट्रीय आघाडी सरकारमधील खासदार भूमिका बदलू शकतात'.

राहुल गांधी यांनी पुढे म्हटलं की, 'लोकसभा निवडणुकीचा निकाल मोदी सरकारच्या विरोधात आला आहे. भाजप घृणा पसरवू शकते. द्वेष पसरवू शकते. भाजप त्याचा फायदा घेऊ शकते. पण या बाबींना देशातील जनतेने नकार दिला आहे'.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला. २०१४ आणि २०१९ वर्षांच्या निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या भाजपने यंदा फक्त २४० जागा मिळाल्या. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २९३ जागा जिंकल्या. तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसने एकूण ९९ जागा जिंकल्या.

यंदा भाजप स्वबळावर २७२ जागांचा मॅजिक फिगर आकडा गाठू शकली नाही. त्यामुळे सरकार चालवण्यासाठी त्यांना मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. एनडीएमध्ये २४० जागांसोबत भाजप मोठा पक्ष आहे. दुसऱ्या क्रमांकावर चंद्रबाबू नायडू आहेत. त्यांच्याकडे १६ खासदार आहेत. तर नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाकडे १२ खासदार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day: राज्यात चिकन, मटण बंदी? स्वातंत्र्यदिनी व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला?

Maharashtra Politics: मनसे-शिवसेनची टाळी वाजली; पण राज ठाकरेंसाठी आघाडीची दारी अजून बदंच!

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री उद्या घेणार राज्यातील गणेशोत्सवाच्या संदर्भात महत्त्वाची बैठक

Independence Day 2025 : पंतप्रधान मोदी सलग १२ व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार, तर नेहरू आणि इंदिरा गांधींना किती वेळा मिळाला हा मान?

Maharashtra Politics : अजित पवार गटाला हादरा! बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT